Join us  

उर्फी जावेदच्या मागे पापाराझी का धावतात? सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:14 PM

Celebrity Photographer Viral Bhayani : सेलिब्रिटींचं खासगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. सेलिब्रिटी सार्वजनिक स्थळी दिसतात आणि मीडियात त्याची चवीनं चर्चा होताना दिसते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझींचा मोलाचा वाटा असतो.

सेलिब्रिटींचं खासगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. सेलिब्रिटी सार्वजनिक स्थळी दिसतात आणि मीडियात त्याची चवीनं चर्चा होताना दिसते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझींचा मोलाचा वाटा असतो. पापाराझी (paparazzi) म्हणजे कोण, तर सेलिब्रिटींचे कळत-नकळत फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सला पापाराझी म्हणतात. या पापाराझी संस्कृतीमधील अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्सला करोडो लोक फॉलो करतात. यापैकीच एक नाव म्हणजे, विरल भयानी (Viral Bhayani). विरल हा एक मोठा व लोकप्रिय सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो. विरलसाठी आज अनेक फोटोग्राफर्स मुंबईच्या गल्लीबोळात काम करतात. याच विरल भयानीने अलीकडे ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विरल रणबीर-आलियावर काहीसा भडकलेला दिसला.

रणबीर-आलियाला काय सिद्ध करायचं होतं?महिनाभराआधी रणबीर कपूर व आलिया भटचं लग्न झालं. विरल व अन्य पापाराझी हे लग्न कव्हर करण्यासाठी रात्रंदिवस रणबीरच्या घराबाहेर ठाण मांडून होते. विरल यावर बोलला. तो म्हणाला, ‘या लग्नाची परिस्थिती धडकी भरवणारी होती. पण रणबीर व आलियाला काय सिद्ध करायचं होतं माहित नाही. रणबीर -आलिया मोठ्यांचा आदर करतात, सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण हेच काम ते एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही करू शकले असते. आम्हाला चांगले फोटो मिळाले असते आणि सगळं काही ठीक झालं असतं. तुमची नेटवर्थ 830 कोटींपेक्षाही जास्त आहे आणि हे सगळं करून तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता?’ फिरोज खानसारखा माणूस हवा. फरदीनच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रिट केलं होतं, ते कौतुकास्पद होतं. सगळ्यांना फोटो मिळतील, याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांनी अगदी आमचीही गेस्ट सारखी जेवणाची व्यवस्था केली होती. कतरिना-विकीच्या लग्नातही आमच्यासाठी काहीही नव्हतं. मी यावर बोलणारा कोणी नाही. पण एक पब्लिक सेलिब्रिटी या नात्यानं तुम्हाला हे करायला हवं. फॅन्स तुमच्यावर इतकं प्रेम करतात, त्याचा मान राखायला हवा, असं विरल म्हणाला.

अनेक फिल्म स्टार्स आम्हाला धमकावतात...अनेकदा फिल्म स्टार्स मला व्हिडीओ वा फोटो हटवण्यासाठी कॉल करतात. धमकावतात. मी असं करण्यास नकार देतो. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी माझा राग करतात. माझी चूक असेल तर मात्र मी मान्य करतो. अनुष्का प्रेग्नंट असताना आम्ही तिच्या कारचा पिच्छा करून व्हिडीओ बनवला होता व तो पोस्ट केला होता. लोकांनी आमच्यावर सडकून टीका केली होती. ती प्रेग्नंट होती, स्पीड ब्रेकर वगैर आला असता आणि तिला काही झालं असतं तर, असं लोक म्हणाले होते. त्यावेळी मला माझी चूक कळली. लोक योग्य होते. आम्हालाही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, असंही तो म्हणाला.

उर्फीच्या मागे का धावतात फोटोग्राफर्स?आपल्या चित्रविचित्र पोशाखामुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या मीडिया सेन्सेशन बनली आहे. ती ट्रोल होते, पण तिला कुणीही इग्नोर करू शकत नाही. ती दिसतात पापाराझी तिला घेराव घालतात. यामागचं कारण विरलने सांगितलं. सध्या उर्फी जावेद ही बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. उर्फीचे फोटो विकले जातात, हेच कारण आहे की, फोटोग्राफर्स तिच्या मागे फिरतात, असं विरल भयानी म्हणाला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीआलिया भटरणबीर कपूर