Join us  

१ कप चहा आणि १ कॅपेचिनोसाठी 'या' अभिनेत्याला मोजावे लागले होते ७८ हजार रूपये, कधीच विसरणार नाही व्हॅकेशन दरम्यानचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 6:00 AM

कीकू शारदा व्हॅकेशन एन्जॅाय करण्यासाठी बाली, इंडोनेशियाला गेला होता. खाण्यापिण्याचा शौकिन असलेला कीकू बालीच्या रेस्टॉरंटमधील डिशेसचा आनंद घेताना दिसला होता.

सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वच सेलिब्रेटींना त्यांचे व्हॅकेशनचे दिवस आठवू लागले आहेत.  प्रसिद्ध कॉमेडीयन कीकू शारदालाही त्याचे व्हॅकेशनचे दिवस आठवले असणार  त्याला कारणही तसे खासच आहे. कारण कीकू शारदा व्हॅकेशन एन्जॅाय करण्यासाठी बाली, इंडोनेशियाला गेला होता. खाण्यापिण्याचा शौकिन असलेला कीकू बालीच्या रेस्टॉरंटमधील डिशेसचा आनंद घेताना दिसला होता. 

त्यावेळी कीकू शारदाला एक कप चहा आणि कॉफीसाठी मोजावी लागलेली रक्कम ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. कीकूने एक कप चहा आणि कॉफीसाठी ७६ हजार ६५० रुपये इतके पैसे मोजावे लागले होते. कीकू शारदाला जे ७६ हजार ६५० रुपये बिल देण्यात आले होते, त्याची भारतीय चलनानुसार किंमत होती चारशे रुपये. कीकूने बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

 

बिलात एक कप चहासाठी ३० हजार आणि एका कॅपेचिनोसाठी ३५ हजार रुपये असे दोन्ही मिळून ७८ हजार ६५० रुपये दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. “एक कॅपेचिनो आणि एका चहासाठी ७८ हजार ६५० रुपये मोजावे लागणार म्हटल्यावर भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. असेच काहीसे त्यावेळी कीकूचेही झाले होते.

त्यावेळी त्याने सांगितले होते की, माझी काहीही तक्रार नाही. कारण मी इंडोनेशिया, बालीमध्ये आहे. भारतीय चलनानुसार त्याची किंमत फक्त ४०० रुपये इतकी आहे. छोट्या मोठ्या खाण्यासाठी सेलिब्रिटींना मोठी रक्कम अदा करावी लागल्याचं याआधी समोर आले होते. चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २ केळ्यांसाठी अभिनेता राहुल बोसला ४४२ रुपये अदा करावे लागले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि बराच काळ चर्चेत राहिलं होते.  

टॅग्स :किकू शारदा