Join us  

Pushpa Srivalli Viral Video : पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 8:58 PM

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही.

Pushpa Srivalli Viral Video : साऊथस्टार अलू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा पुष्पा हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांसह हिंदीतही रिलीज झाल्याने महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील काही गाणी आणि त्यावर केलेला डान्सही तुफान व्हायरल होत आहे. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेर अगदी परदेशात या चित्रपटांची आणि काही खास सीन्सची क्रेझ दिसून येते आहे. चित्रपटाच्या रिलीजला सुमारे तीन महिने होत आले असले तरी अजूनही इन्स्टाग्राम पोस्ट, स्टोरीज आणि रील्सवर 'पुष्पा' आणि 'श्रीवल्ली'चंच राज्य आहे. तशातच एका परदेशी सेलिब्रिटीने पुष्पामधील काही सीनमध्ये आपला चेहरा लावत एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतात पुष्पा चित्रपटांच्या चाहत्यांची अजिबात कमतरता नाही. पण त्यासोबतच परदेशात अगदी ऑस्ट्रेलियातही पुष्पा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला असल्याचं दिसतंय. सध्या एक व्हिडीओ बराच चर्चेत आला असून त्यात पुष्पा चित्रपटातील काही सीन एकत्र करण्यात आलेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे, त्या व्हिडीओमध्ये श्रीवल्लीच्या शेजारी उभा असलेला माणूस हा अल्लू अर्जुन नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हा माणूस नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. तर श्रीवल्लीच्या बाजूला उभा असलेला हा माणूस म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर (David Warner).

डेव्हिड वॉर्नर हा IPL खेळायला लागल्यापासून भारतीय चित्रपटांचा खूप मोठा फॅन झाला आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांचाही तो खूप मोठा चाहता आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात डेव्हिड वॉर्नरने अल्लू अर्जुनच्या जागी चक्क स्वत:चा चेहरा लावून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याने शेअर करताच त्याच्या लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदानाडेव्हिड वॉर्नर