Join us  

'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:52 PM

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे बजेट आतापर्यंत १२५ कोटींपर्यंत पोहचले आहे.

ठळक मुद्दे'मणिकर्णिका'मध्ये वापरलेत खूप स्पेशल इफेक्ट्सकंगना रानौत व अंकिता लोखंडेवर चित्रीत होणार गाणे

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतला आगामी सिनेमा 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' भव्य दिव्य बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवायची नाही. त्यामुळे ती या सिनेमाच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने पाहत आहे. या चित्रपटाचे बजेट आतापर्यंत १२५ कोटींपर्यंत पोहचले आहे. चित्रपटाचे बजेट स्पेशल इफेक्ट्समुळे नाही तर पुन्हा चित्रीकरण करावे लागले त्यामुळे वाढले आहे.

'मणिकर्णिका' सिनेमाच्या चित्रीकरणाला जेव्हा वाराणसीमध्ये सुरूवात झाली होती. त्यावेळी सिनेमाचे बजेट जवळपास साठ कोटी होते. मात्र बाहुबलीसारखी भव्यता दिव्यता आणण्यासाठी या सिनेमात भरपूर स्पेशल इफेक्ट्सचा वापर केला जाणार आहे. तसेच सिनेमातील बरेच सीन पुन्हा चित्रीत केले आहेत. त्यामुळे चित्रपटाचे बजेट वाढले आहे. सूत्रांकडून समजते आहे की बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी 'मणिकर्णिका' सिनेमाची कथा लिहिली अाहे आणि त्यांनी स्क्रीप्टमध्ये खूप बदल केले आहेत.सूत्रांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मीबाई व झलकारी बाईचे भावनिक बॉण्डिंग, त्यांचे लग्न व पहिल्या मुलाचा मृत्यू या दृश्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल झाले असून २० कोटींचे बजेट अतिरिक्त झाले आहे. हा कंगनाचा बिग बजेट चित्रपट आहे. तसेच या सिनेमात एक गाणे चित्रीत केले जाणार आहे जे संजय लीला भन्साळींच्या सिनेमातील 'डोरा रे डोला' व 'पिंगा' गाण्यासारखे असेल. या गाण्यावर कंगना व अंकिता लोखंडे थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात त्या दोघींमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण लवकरच केले जाणार असून त्यासाठी भव्य सेट बनवला जाणार आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. 'मणिकर्णिका' चित्रपटांच्या चर्चांमुळे या सिनेमाबाबत आणखीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कंगनाचे चाहते उत्सुक आहेत.

 

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी