BOX OFFICE : दोनच दिवसांत ‘टायगर जिंदा है’ने मारली जोरदार मुसंडी; इतक्या कोटींचे केले कलेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 18:56 IST
सलमान आणि कॅटरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जोरदार मुसंडी मारली असून, कमाईचे आकडे आता शंभर कोटींच्या जवळपास पोहोचले आहेत.
BOX OFFICE : दोनच दिवसांत ‘टायगर जिंदा है’ने मारली जोरदार मुसंडी; इतक्या कोटींचे केले कलेक्शन!
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने जोरदार मुसंडी मारली आहे. बॉक्स आॅफिसवर शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची दोनच दिवसांची कमाई थक्क करणारी आहे. ओपनिंग डेला ३३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमविणाºया या चित्रपटाने दुसºया दिवशी ३४.५० कोटींचा व्यवसाय केला. दोनच दिवसांमध्ये या चित्रपटाने ६८.२५ कोटींचा गल्ला जमविल्याने तिसºया दिवशी म्हणजेच रविवारीच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता आहे. सलमान खानचा गेल्या वेळचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. मात्र ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून तो दमदार मुसंडी मारताना दिसत आहे. कॅटरिनाविषयी सांगायचे झाल्यास तिचेही गेल्या काळातील चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत. ‘जग्गा जासूस, बार-बार देखो आणि फितूर’ हे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरल्याने तिचे करिअरही अडगळीच्या मार्गावरच होते. परंतु आता असे वाटत आहे की, दोघांनाही ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून एक लय सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलमान कॅटची जोडी प्रेक्षकांकडून चांगली पसंत केली जात आहे. वास्तविक चित्रपटात कॅटरिनाची भूमिका फारशी मोठी नाही, परंतु सलमानसोबत अॅक्शन सीन्स करताना तिला बघणे खूपच रोमांचक ठरत आहे. तर सलमानविषयी सांगायचे झाल्यास, दुसºयांदा तो त्याचे फेव्हरेट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत काम करीत आहे. गेल्यावेळेस त्याने त्यांच्यासोबत ‘सुलतान’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता सलमानचा हा चित्रपट किती रेकॉर्ड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या चित्रपटात सलमान-कॅट व्यतिरिक्त अंगद बेदी, गिरीश कर्नाड आणि सज्जाद डेलाफ्रूज यांच्याही दमदार भूमिका आहेत.