तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी चित्रपटाच्या खात्यात २.३५ कोटी रुपयांची भर पडली. ‘हिचकी’ने पहिल्या दिवशी ३.३० कोटी, दुसºया दिवशी ५.३५ कोटी, तिसºया दिवशी ६.७० कोटी, तर चौथ्या दिवशी २.४० कोटी रूपयांचा व्यवसाय केला. राणीच्या या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली असून, चित्रपटाला हिट चित्रपटाच्या रांगेत स्थान मिळाले आहे.#Hichki is ROCK-STEADY... Fri 3.30 cr, Sat 5.35 cr, Sun 6.70 cr, Mon 2.40 cr, Tue 2.35 cr. Total: ₹ 20.10 cr [961 screens]. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2018
BOX OFFICE : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ने निर्मितीचा खर्च केला वसूल, वाचा पाचव्या दिवसांपर्यंतची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:45 IST
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करीत बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने निर्मितीचा खर्च वसूल केला आहे.
BOX OFFICE : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ने निर्मितीचा खर्च केला वसूल, वाचा पाचव्या दिवसांपर्यंतची कमाई!
अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वुमन सेंट्रिक ‘हिचकी’ या चित्रपटाने पाच दिवसांत निर्मितीचा खर्च वसूल केला आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणाºया राणी मुखर्जीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ती बॉलिवूडची मर्दानी आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ९६१ स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २०.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. राणी मुखर्जी व्यतिरिक्त या चित्रपटात एकही मोठा स्टार नाही. अशातही राणीने आपल्या जबरदस्त अभिनय आणि स्क्रिप्टच्या जोरावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यास भाग पाडले. यशराज बॅनरच्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च आला. दरम्यान, राणीने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. राणी अखेरीस २०१४ मध्ये ‘मर्दानी’ या चित्रपटात एका दबंग पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. त्यानंतर तिने प्रेग्नेंसी आणि मुलगी आदिराच्या पालनपोषणामुळे बॉलिवूडमधून काही काळ ब्रेक घेतला होता. आता तिने ‘हिचकी’च्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक केला आहे. ज्या पद्धतीने तिने चित्रपटात भूमिका साकारली त्यावरून आगामी काळात तिचे आणखी दमदार चित्रपट येण्याची शक्यता आहे.