Join us

BOX OFFICE : गर्लगॅँगने केली कमाल; ‘वीरे दी वेडिंग’ची बॉक्स आॅफिसवर धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 20:20 IST

करिना कपूर-खान आणि सोनम कपूर-आहुजा यांच्या बहुचर्चित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने ओपनिंग डेलाच रिकॉर्डब्रेक कमाई करीत बॉक्स आॅफिसवर ...

करिना कपूर-खान आणि सोनम कपूर-आहुजा यांच्या बहुचर्चित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने ओपनिंग डेलाच रिकॉर्डब्रेक कमाई करीत बॉक्स आॅफिसवर दबदबा निर्माण केला आहे. सोनम, करिनासह स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांची मुख्य भूमिका असलेल्या या गर्लगॅँगने धूम उडवून दिली आहे. हा चित्रपट बघण्यासाठी तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या रेकॉर्डविषयी सांगायचे झाल्यास यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांमध्ये ‘वीरे दी वेडिंग’ला तिसरे स्थान मिळाले आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर १०.७० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. बॉलिवूडपटांविषयी सांगायचे झाल्यास, यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाºयांमध्ये ‘बागी-२’ (२५.१० कोटी) ने पहिले स्थान मिळविले आहे. तर दुसºया स्थानी शाहिद कपूरचा ‘पद्मावत’ (१९ कोटी) हा चित्रपट आहे. आता ‘वीरे दी वेडिंग’ने तिसºया स्थानावर मजल मारली असून, वीकेण्डच्या शनिवार आणि रविवार या दिवशी चित्रपटाबद्दल प्रचंड अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा चित्रपट भारतात २१७७ स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. तर ओव्हरसीज चित्रपटाला ४७० स्क्रीन मिळाल्या आहेत. वर्ल्डवाइट २६४७ स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखविला जात असून, त्यास तुफान प्रतिसाद मिळत आहे.  दरम्यान, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची कथा चार तरुणी आणि त्यांच्यातील मैत्रीवर आधारित आहे. चित्रपटात पहिल्यांदाच करिना आणि सोनमची जोडी बघावयास मिळत आहे. तर स्वरा, शिखासह सुमित व्यासचीही प्रमुख भूमिका आहे. ‘वीरे दी वेडिंग’च्या माध्यमातून करिनाने तब्बल दोन वर्र्षांनंतर कमबॅक केले आहे. मुलगा तैमूरच्या जन्मानंतर तिने हा पहिला चित्रपट केला आहे.