दरम्यान, हा चित्रपट भारतात पाच हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता, तर वल्डवाइड नऊ हजार स्क्रिन्सवर दाखविण्यात आला. २८ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अनेक रेकॉर्ड केले. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनविण्यात आलेल्या या चित्रपटात अभिनयाबरोबरच सर्वच गोष्टी कमालीच्या असल्याने प्रेक्षक त्यास प्रचंड प्रतिसाद देत आहेत. शिवाय या चित्रपटातील सर्वच पात्र हे रातोरात प्रसिद्धी झोतात आले आहेत. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या स्टारडममुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाळा यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. हे आकडे थक्क करणारे असून, बाहुबलीचा रेकॉर्ड ब्रेक करणे खूपच अवघड असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्याकृष्णा, सत्यराज आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.#Baahubali2 's 29 Days WW BO: #India:Nett : ₹ 1,018 CrGross : ₹ 1,313 CrOverseas:Gross : ₹ 300 CrTotal: ₹ 1,613 Crs— Ramesh Bala (@rameshlaus) May 27, 2017
Box Office : ‘बाहुबली-२’ने २९ दिवसांत कमाविले १६१३ कोटी रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 21:04 IST
रिलीज होऊन एक महिनाही पूर्ण झाला नसताना ‘बाहुबली-२’ने कमाईचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने ...
Box Office : ‘बाहुबली-२’ने २९ दिवसांत कमाविले १६१३ कोटी रुपये!
रिलीज होऊन एक महिनाही पूर्ण झाला नसताना ‘बाहुबली-२’ने कमाईचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या चवथ्या आठवड्यात तब्बल ११.१ कोटी रुपयांची कमाई केली. यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की, चित्रपटाचा जलवा अजूनही कायम आहे. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’, ‘हिंदी मीडियम’, ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘सरकार-३’ हे बड्या बॅनरचे चित्रपट रिलीज होऊनही बाहुबलीची क्रेझ तसूभरही कमी झालेली दिसत नाही. त्यामुळेच २९व्या दिवशी ‘बाहुबली-२’ने वल्डवाइज १६१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी वर्जनमध्येही बाहुबलीने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. हिंदी वर्जनमध्ये बाहुबलीने तब्बल ४८९.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाची घोडदौड सुरू असल्याने लवकरच पाचशे कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. कारण देशातील बहुतांश भागांमध्ये आजही या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी होत आहे. भारतातच नव्हे तर जगातील विविध देशांमध्ये हा चित्रपट बघितला जात असल्याने लवकरच दोन हजार कोटी रुपयांचा आकडा गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.