Join us  

हम बने तुम बने एक दूजे के लिए...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:34 AM

बॉलिवूड म्हटलं म्हणजे त्यात लव्ह, अफेअर, डेटिंग त्यानंतर ब्रेकअप अशा घटना रोजच ऐकायला मिळतात. शिवाय लग्न करुन बरेचवर्ष एकत्र राहूनही घटस्फोट झालेले बरेच उदाहरणंही आहेत.

-रवींद्र मोरेबॉलिवूड म्हटलं म्हणजे त्यात लव्ह, अफेअर, डेटिंग त्यानंतर ब्रेकअप अशा घटना रोजच ऐकायला मिळतात. शिवाय लग्न करुन बरेचवर्ष एकत्र राहूनही घटस्फोट झालेले बरेच उदाहरणंही आहेत. मात्र याला अपवाद असेही काही कपल्स आहेत, जे जणू एकमेकांसाठीच बनले आहेत. जाणून घेऊया त्या कपल्सच्या बाबतीत...

* अभिषेक-ऐश्वर्याअभिषेक, ऐश्वर्याला आपल्यासोबत प्रत्येक इव्हेंटमध्ये सोबत घेऊन जाण्यास कधीही विसरत नाही. एवढेच नव्हे तर तिच्यासाठी प्रेमापासून ते कोणत्याही गोष्टीची कमतरता ऐशला भासू देत नाही. त्यातच ऐशला अभिषेकच्या संपूर्ण घराचे प्रेमदेखील मिळते.     

* अजय-काजोलबॉलिवूडचा सिंघम अर्थात सुपरस्टार अजय देवगन स्वभावाने जरी गंभीर वाटत असला तरी काजोलच्या बाबतीत त्याचे मन खूपच प्रेमळ आहे. या जोडीचे खास वैशिष्टे म्हणजे अजय जेवढा सीरियस आहे काजोल तेवढीच चुलबुली आहे. विशेष म्हणजे अजय शूटिंगच्या वेळी कितीही बिझी असला तरी काजोलच्या बाबतीत जाणून घेण्यास तो नेहमी उत्सुक असतो.  

* रितेश-जेनेलियालवबर्ड रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची जोडीदेखील बॉलिवूडमध्ये खूपच फेमस आहे. या जोडीचे दोन मुलेही आहेत. जेनेलिया तशी चित्रपटात खूपच कमी दिसते, मात्र रितेश बॉलिवूडमध्ये कॉमेडी भूमिका करण्यास नेहमी सज्ज असतो. रितेश आणि जेनेलिया एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात आणि तेथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती.  

* अक्षय-ट्विंकलबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुंदर अभिनेत्री ट्विंकल खन्नाची जोडीदेखील बॉलिवूडमध्ये खूपच फेमस आहे. अक्षयने नुकताच करण जौहरच्या टॉक शोमध्ये खुलासा केला होता की, तो शूटिंगदरम्यान ट्विंकल खन्नाचा कॉल रिसिव्ह करायला कधीही विसरत नाही. या गोष्टीने स्पष्ट जाहिर होते की, अक्षय ट्विंकलची किती काळजी घेतो.  

*  शाहरुख-गौरीशाहरुख आणि गौरीचे नाते तर सर्वांसाठी एक आदर्शच मानावे लागेल. शाहरुखने गौरीला मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. एवढेच नव्हे तर गौरीने अनेकदा नकार देऊनही शाहरुखने गौरीचा पाठलाग करणे सोडले नव्हते. आज जणू प्रेमासाठी शाहरुखने जगातील सर्व सुख तिच्या झोळीत आणून दिले.   

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाशाहरुख खानअक्षय कुमार