Join us  

इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 10:28 AM

वाजिद खानच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनानंतर आता प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानचे किडनी आणि कोरोनाच्या आजारामळे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनावर प्रियंका चोप्रा यांच्यासोबत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रियंका चोप्राने ट्विटरवर लिहिले की, वाईट बातमी. मला एक गोष्ट नेहमी लक्षात राहिल ती म्हणजे वाजिद भाईचे हसणं. ते नेहमी हसत रहायचे. खूप लवकर गेले. त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो मित्रा. तुझ्यासाठी प्रार्थना.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, वाजिद खानच्या निधनाचे वृत्त धक्कादायक होते. एका उज्ज्वल हसत्या प्रतिभेचे निधन झाले. त्याच्यासाठी प्रार्थना व संवेदना.

अक्षय कुमारने ट्विट केले की, वाजिद खानच्या अकाली निधनाबद्दल ऐकून मी हैराण आणि दुःखी झालो. प्रतिभावंत आणि नेहमी हसतमुख असे ते व्यक्तिमत्त्व होते. खूप लवकर निघून गेले. या कठीण समयी देव त्यांच्या कुटुंबाला ताकद देवो.

अदनान सामीने वाजिद खानच्या निधनावर शोक व्यक्त करीत ट्विट केले की, मी हैराण आहे. माझ्या प्रेमळ भावाला मी हरपले आहे. ही वाईट बातमी मला सहन होत नाही. कारण त्याच्या आत एक सुंदर आत्मा होती.

 प्रीती झिंटाने वाजिद खानसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, मी त्यांना भाऊ म्हणत होते. ते खूप प्रतिभावंत होण्यासोबतच जेंटल आणि चांगले होते. माझे मन तुटले आहे की मला वाजिद खानला प्रेमाने गुडबाय बोलण्याचीही संधी मिळाली नाही. मी तुम्हाला व आपल्या सेशनला नेहमी स्मरणात ठेवीन. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू.RIP.

गायक सलीम मर्चंटने लिहिले की, साजिद-वाजिद फेम माझा भाऊ वाजिदच्या निधनाच्या वृत्तामुळे मला धक्का बसला आहे. तू खूप लवकर गेलास. हा आपल्या समुदायासाठी खूप मोठा झटका आहे. मी तुटून गेलो आहे.

सोनू निगममे साजिद-वाजिद सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, माझा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून गेले.

परिणीती चोप्राने ट्विट केले की, वाजिद भाई तुम्ही खूप चांगले माणूस होतात. नेहमी हसत रहायचात. नेहमी गात रहायचे. तुमच्यासोबतचे संगीत सत्र नेहमी लक्षात राहील. खरंच तुमची आठवण येईल वाजिद भाई.

वरूण धवनने म्हटले की, वाजिद भाई मी आणि माझ्या कुटुंबांच्या खूप जवळचे होते. ते जवळपास असणाऱ्या सकारात्मक लोकांपैकी एक होते. आम्हाला नेहमी तुमची आठवण येईल वाजिद भाई. संगीतासाठी धन्यवाद.

मीका सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, आपल्या सगळ्यांसाठी ही वाईट बातमी आहे. सर्वात प्रतिभावंत गायक आणि संगीतकार ज्यांनी एवढे हिट दिले आहे. माझा मोठा भाऊ वाजिद खान आम्हाला सोडून गेले. अल्लाह त्यांच्या आत्मास शांती देवो.

टॅग्स :वाजिदप्रियंका चोप्रापरिणीती चोप्रावरूण धवनमिका सिंगसोनू निगमअमिताभ बच्चनअक्षय कुमार