अजय देवगणने राजकुमार गुप्ताचा आगामी चित्रपट रेडचे शूटिंग सुरु केले आहे. ज्यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूज दिसणार आहे. यात अजय एका इन्कम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारतो आहे. 16 मार्च 2018 ला रिलीज होणार आहे.Ajay Devgn announces his first Marathi film #AaplaManus... Directed by Satish Rajwade... Stars Nana Patekar, Sumeet Raghavan and Irawati Harshe... 9 Feb 2018 release... Check this video featuring Ajay... pic.twitter.com/hLHbrHpdSX— taran adarsh (@taran_adarsh) December 24, 2017
बॉलिवूडमधला सुपरस्टार हिरो करतोय मराठीत डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 10:55 IST
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अजय देवगणने स्वत: या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर एक ...
बॉलिवूडमधला सुपरस्टार हिरो करतोय मराठीत डेब्यू
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अजय देवगणने स्वत: या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. या व्हिडिओला शेअर करताना समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिले आहे की, ''अजय देवगणने आपला पहिला मराठी चित्रपट आपला माणूस या चित्रपटाच्या निर्मितीचे संकेत दिले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश रजवाडे करणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, आणि इरावती हर्षे हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.'' या व्हिडिओसोबत अजय देवगणने आपले महाराष्ट्राच्या मातीशी असलेले नातं ही सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा ऐकायला मिळाली होती की अजय देवगण डिस्कवरीचा नवा चॅनल डिस्कवरी जीतवर बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करणार आहे. या शोच्या माध्यमातून अजय देवगण निर्माता म्हणून टीव्ही आपली सुरुवात करायला जातो आहे. ALSO READ : अजय देवगण चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘या’ साउथ अभिनेत्रीसोबत करणार काम!यानंतर अजय एका अरबन लव्ह स्टोरीवर आधारित आहे. अजय आणि तब्बूची जोडी नुकतीच प्रेक्षकांनी गोलमाल अगेनमध्ये बघितली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गेला त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फक्त अजय देवगण नाही तर विद्युत जामवालसुद्धा आपला चित्रपट दसऱ्याच्या दिवशी रिलीज करणार आहे. विद्युतच्या चित्रपटाचे नाव जंगली आहे.विद्युत आणि अजयने बादशाहो चित्रपटात एकत्र काम केले आहे. विद्युतच्या चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर तो एक एक्शन चित्रपट असणार आहे. हॉलिवूडचा दिग्दर्शक रसेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आता हे बघणं उत्सुकतेचे ठरेल की प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंती देतायेत.