Join us  

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 7:31 PM

केवळ मान्यता दत्तच्या सांगण्यावरून यांच्यातला वाद थांबला. तेव्हापासून चांगले मित्र कधी वैरी झाले हे त्यांनाच त्यांचे समजले नाही.

बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. २०१० दरम्यान कंगना राणौत आणि संजय दत्तची खुप चांगली मैत्री  होती. दोघांनी एक नाही दोन नाही तर चार सिनेमात एकत्र काम केले होते. त्यासोबतच दोघांनी 'उंगली' सिनेमाही केला. संजय दत्तने  २०११ मध्ये  निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले. त्याने त्याच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. त्याने त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ‘रासकल्स’ सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. डेविड धवन या सिनेमाचे दिग्दर्शन करत होते. सिनेमात संजय दत्त, अजय देवगन आणि कंगना मुख्य भुमिकेत होते.

सिनेमाची शूटिंग सुरू झाल्यानंतर डेविड धवन यांना  कंगणाने सिनेमात बिकीनी सीन द्यावा संजय दत्तला सांगितले, बिकीनी सीनमुळे सिनेमा अधिक लक्षवेधून घेईल असे संजयला सांगण्यात आले. त्यामुळे धवन यांनी कंगणाला बिकीनी सीनबद्दल सांगितले तेव्हा तिने नकार दिला. कारण सिनेमा साईन करताना अशाप्रकारे कोणत्याच सीनविषयी सांगण्यात आले नव्हते. नंतर संजूबाबाच्या सांगण्यावरून ती तयार झाली. मात्र त्यासाठी तिने एक अट ठेवली होती.

 

१० लाख रूपये तिला या सीनसाठी देण्यात यावी अशी तिने अट ठेवली. तिची ही अटही मान्य करण्यात आली. त्यानुसार बिकीनी सीन शूट करण्यात आला. मात्र जेव्हा सिनेमा कंगणाने पाहिला तेव्हा तिला जाणवले की, सिनेमात बिकीनी सीनची आवश्यकताच नव्हती.

 

जाणून बुजून हा सीन घुसवण्यात आला असल्याचे तिने सांगितले. यामुळे संजय दत्त आणि कंगणामध्ये मोठा वादही झाला होता. केवळ मान्यता दत्तच्या सांगण्यावरून यांच्यातला वाद थांबला.  तेव्हापासून चांगले मित्र कधी वैरी झाले हे त्यांनाच त्यांचे समजले नाही. 

 ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा कंगणाचा दावा 

काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून कंगना रणौतच्या बेकायशीर कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आलं होतं. सध्या हे प्रकरण न्यायालायापर्यंत पोहोचलं आहे. आता कंगना रणौतने मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिनं आता केली आहे. ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा दावा कंगणानं केला आहे. या प्रकारणावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाडून सुनावणी होईल. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिका सिद्ध करू शकली नाही तर नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपये कंगनाला द्यावे लागतील.

'Y' दर्जाच्या सुरक्षेवर कंगनाचे उत्तर 

शिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशात परतली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना व शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. मुंबई मला असुरक्षित वाटत असल्याचे विधान तिने केले होते. यानंतर केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :कंगना राणौतसंजय दत्त