Join us  

थोडा रोमान्स, थोडा ड्रामा...!  ‘Valentine's Week’मध्ये रिलीज होणार हे सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:00 AM

‘व्हॅलेन्टाईन वीक’मध्ये रिलीज होणा-या चित्रपटांची यादी ...

ठळक मुद्दे14  फेब्रुवारी  व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा रिलीज होतोय.

आजपासून ‘व्हॅलेन्टाईन वीक’ला सुरुवात झालीय. 14  फेब्रुवारी ला व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जातो. तत्पूर्वीचा आठवडाही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ‘व्हॅलेन्टाईन वीक’मध्ये दोन शुक्रवार आहेत आणि शुक्रवार म्हटल्यानंतर सिनेप्रेमींना नव्या बॉलिवूड सिनेमांची मेजवाणीही मिळणार आहे. चला तर जाणून घेऊ या, ‘व्हॅलेन्टाईन वीक’मध्ये रिलीज होणा-या चित्रपटांची यादी आणि या चित्रपंटांचे ढोबळ कथानक...

आज शुक्रवारी म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन वीक’च्या पहिल्या दिवशी एकूण तीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. मलंग, हॅक्ड आणि शिकारा असे हे तीन चित्रपट... 14 फेब्रुवारीलाही लव्ह आज कल 2, हम भी अकेले तुम भी अकेले आणि हवाएं हे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

मलंग

व्हॅलेन्टाईन वीकची सुरुवात आदित्य राय कपूर आणि दिशा पाटनी यांच्या ‘मलंग’ या सिनेमाने होणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आज 7  फेब्रुवारी ला रिलीज होणाºया या सिनेमात आदित्य व दिशाचा रोमान्स शिवाय ड्रामा पाहायला मिळणार आहे. आदित्य व दिशा गोव्यात भेटतात, दोघांत प्रेम होते आणि यानंतर अचानक एक टिष्ट्वस्ट येतो. पाच वर्षांनंतर आदित्य अचानक लोकांची हत्या करणे सुरु करतो. अनिल कपूर व कुणाल खेमू त्याला पकडण्यासाठी जीवाचे रान करतात... अशी याची कथा आहे.

हॅक्ड

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही ‘हॅक्ड’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. या सिनेमात एका सायको लव्हरची स्टोरी दाखवली आहे. हा सायको लव्हर हिनाचे सोशल अकाऊंट हॅक करून तिला उद्धवस्त करण्याचा निश्चय करतो, पुढे काय होते, ते यात पाहायला मिळणार आहे.

शिकारा

तूर्तास वादात सापडलेला ‘शिकारा’ हा सिनेमाही ‘व्हॅलेन्टाईन वीक’च्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्यावर भाष्य करणा-या या सिनेमात एक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. अर्थात निर्माता दिग्दर्शक विधु विनोद चोप्रांच्या या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी करत, काही लोकांनी जम्मू काश्मिर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

लव्ह आज कल2

14  फेब्रुवारी  व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा रिलीज होतोय. इम्तियाज अली यांचा  ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता इम्तियाज  ‘लव्ह आज कल 2’च्या रूपात याचा सीक्वल घेऊन येत आहेत. यात एकीकडे सारा व कार्तिकची तर दुसरीकडे कार्तिक व आरूषी शर्माची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

हम भी अकेले तुम भी अकेले

याच दिवशी ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ हा सिनेमाही रिलीज होतोय. अर्थात याची कुठेही चर्चा नाही. यात एका गे मुलाची व एका लेस्बियन मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. यात जरीन खान मुख्य भूमिकेत आहे. 

The Winds - Hawayein  या चित्रपटात भावेश कुमार, अभिनेत्री इस्टर नोरोन्हा, किरण कुमार  परिक्षीत साहनी मुख्य भूमिकेत आहेत. भारत भ्रमणावर निघालेल्या एका तरूणाची कथा यात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :व्हॅलेंटाईन वीकलव आजकलबॉलिवूड