Join us  

बॉलिवूडचा ‘मौके पर चौका’! एक दोन नाही तर ‘कोरोना’वर बनणार अनेक चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:50 AM

ऐकून आश्चर्य वाटेल पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय.

ठळक मुद्देइरॉसशिवाय अन्य काही निर्मात्यांनीही कोरोना व्हायरसवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु केली आहे.

सुमारे 100 देशांत पाय पसरवणा-या कोरोना व्हायरसने भारतातही पाय पसरवणे सुरु केले आहे. साहजिकच अख्ख्या देशात भीतीचे सावट आहे. अनेक लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाही. चित्रपटांचे, मालिकांचे शूटींग रद्द करण्यात आले आहेत. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकण्यात आला आहे. एकंदर काय तर कोरोनाचा मनोरंजन विश्वाला जोरदार फटका बसला आहे. पण हो, एक फायदा मात्र नक्कीच झाला आहे. होय, कोरोनाच्या निमित्ताने बॉलिवूडला नवी कल्पना मिळाली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. याचा अर्थ येत्या दिवसांत कोरोनावरचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इरॉस इंटरनॅशनल ‘कोरोना प्यार है’ नामक चित्रपट बनवणार आहे. इरॉसने ‘कोरोना प्यार है’ हे टायटलही रजिस्टर केले आहे. ‘कोरोना प्यार है’ हे टायटल वाचल्यानंतर तुम्हाला अमिषा पटेल व हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ हे नाव हटकून आठवेल. आता याच धर्तीवर ‘कोरोना प्यार है’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या कोरोनामुळे बॉलिवूडचे कामकाज ठप्प झाले आहे. स्थिती सामान्य होताच या सिनेमाचे शूटींग सुरू होईल.

मौके पर चौकाइरॉसशिवाय अन्य काही निर्मात्यांनीही कोरोना व्हायरसवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे मानात तर काही निर्मात्यांनी यासंदर्भात त्यांच्याशी सेपर्क साधला आहे. ‘डेडली कोरोना’ असे एक फिल्म टायटल त्यांच्याकडे आले आहे. इतकेच नाही तर ‘वुहान वेपन कोरोना’, ‘कोरोना द इमर्जन्सी’ आणि ‘कोरोना द ब्लॅक डे’ अशा फिल्म टायटलचीही नोंदणी झालेली आहे.‘मौके पर चौका’ मारण्याची बॉलिवूडची ही पहिलीच वेळ नाही. केदारनाथ महापूर, उरीमधील अतिरेकी हल्ला अशा घटनानंतर लगेच यावरचे चित्रपट तयार झालेत. तूर्तास बालाकोट एअरस्ट्राईकवरही चित्रपट बनतो आहे. 

टॅग्स :बॉलिवूडकोरोना वायरस बातम्या