Join us  

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटो अन् व्हिडिओंनी सोशल मीडियावर माजवलाय धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 7:15 AM

या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र बोल्ड फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. रिया सेन नेहमीच तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. रिया कधी एमएमएसमुळे तर कधी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस कारण वेगळे आहे. सोशल मीडियावरील ट्रान्सपरंट ड्रेसमधील व बोल्ड फोटोमुळे ती चर्चेत आली आगे.

रिया सेनने इंस्टाग्रामवर खूप बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना खूप लाइक्स मिळाले आहेत.

रिया सेनने इंस्टाग्रामवर ट्रान्सपरंट ड्रेसमधीलही एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती खूप सेक्सी दिसते आहे.

काही वर्षांपूर्वी रिया सेनचा सहकलाकार अश्मित पटेल आणि तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या एमएसची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. हा एमएमएस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

2005 मध्ये रिया सेन अश्मित वासू भगनानीसोबत सिलसिले या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली असल्याची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती.

एवढेच नव्हे तर रागिणी एमएमएस रिटर्न या चित्रपटाच्यावेळी अभिनेता निशांत मकलानीने चित्रीकरणाच्यादरम्यान रियाने इंटिमेट सीन चित्रीत करताना त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप तिच्यावर केला होता.

2016 मध्ये एका पार्टीत रिया वाईल्ड अंदाजात दिसली होती. तिने चक्क एका मुलीला किस केले होते. तसेच या पार्टीत अनेक जणांसोबत तिने अश्लील फोटो काढले असल्याचे म्हटले जाते. तसेच क्रिकेटर श्रीसंतसोबत देखील एकेकाळी तिचे नाव जोडले गेले होते. त्या दोघांना अनेक पार्टींमध्ये एकत्र पाहाण्यात आले होते.

रियाने 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला. ती चित्रपटात काम करत नसली तरी नुकतेच तिने पॉइजन या सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

टॅग्स :रिया सेन