आईच्या परवानगीने झाले बोल्ड - जरीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:32 IST
स ध्या सर्वांत चर्चेत असलेला चित्रपट 'हेट स्टोरी ३' बद्दल जरीन खान हिने एक बोल्ड कमेंट केली आहे. ती ...
आईच्या परवानगीने झाले बोल्ड - जरीन
स ध्या सर्वांत चर्चेत असलेला चित्रपट 'हेट स्टोरी ३' बद्दल जरीन खान हिने एक बोल्ड कमेंट केली आहे. ती म्हणते,' तिने 'हेट स्टोरी ३' मध्ये केलेली तिची भूमिका अतिशय बोल्ड असून ही भूमिका करायला तिला तिच्या आईने परवानगी दिली होती. 'वीर' चित्रपटातून डेब्यू केलेल्या जरीन खान हिला बॉलीवूडमध्ये तिचे स्थान मिळत नव्हते. त्यामुळे तिच्या तिने आईच्या परवानगीने या चित्रपटात काम करण्याचा ठाम निर्णय घेतला. तिला प्रथम थोडीशी भीती वाटली की तिची आई काय म्हणेल परंतु, चक्क आईनेच तिला यात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले असे तिने सांगितले.