या अभिनेत्रीचा मृतदेह मिळाला होता कचऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 11:22 IST
चेन्नईमधील रामापुरम येथे कचऱ्यात पोलिसांना काही महिन्यांपूर्वी एक मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह कोणाचा आहे याची अनेक दिवस चौकशी ...
या अभिनेत्रीचा मृतदेह मिळाला होता कचऱ्यात
चेन्नईमधील रामापुरम येथे कचऱ्यात पोलिसांना काही महिन्यांपूर्वी एक मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह कोणाचा आहे याची अनेक दिवस चौकशी पोलिस करत होते. अनेक दिवसांच्या तपासणीनंतर पोलिसांना कळले की, हा मृतदेह एका अभिनेत्रीचा होता.ससिरेखा या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सीता कल्याणम, काथारा यांसारखे तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तसेच तिने अनेक दाक्षिणात्य मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ससिरेखाचा मृतदेह एका कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या शेजारील कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आला होता. मृतदेह मिळाल्यानंतर अनेक दिवस हा मृतदेह कोणाचा आहे हे पोलिसांना कळतच नव्हते. त्यामुळे चेन्नईत हरवलेल्या सगळ्या लोकांच्या आधार कार्डवरील फिंगर प्रिंटची तपासणी करण्यात आली, तेव्हा या मृत्यदेहाच्या फिंगरप्रिंटवरून हा मृतदेह ससिरेखाचा असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. ससिरेखाने गेल्या वर्षी तिच्या पतीच्या विरोधात म्हणजेच रमेश शंकरच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत म्हटले होते की, तिच्या मुलाचे नवऱ्याने अपहरण केले असून एका लघुपटात काम करण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत आहे. एवढेच नव्हे तर त्याने लाखो रुपयांसाठी तिला फसवले आहे. नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर काहीच दिवसात ससिरेखा गायब झाली होती. पोलिसांचा तिच्या पतीवर संशय असल्याने त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केली, त्यावेळी एक स्त्री त्याच्यासोबत होती. पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवल्यानंतर ससिरेखाच्या पतीने कबूल केले होते की, त्यानेच तिचा खून केला असून तिचे डोके एका तलावात फेकून दिले आणि हा खून करण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या स्त्रीने त्याला मदत केली आहे. रमेश शंकरच्या पहिल्या पत्नीने देखील त्याच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती तर त्याच्यासोबत असलेली स्त्री ही त्याची सध्याची प्रेयसी असून तिला चित्रपटात काम मिळवून देण्याचे त्याने तिला आमिष दिले होते. ससिरेखाचे रमेशसोबत दुसरे लग्न होते. तिच्या मुलाला घेऊन ती त्याच्यासोबत राहात होती. रमेश हा दिग्दर्शक असल्याचे ससिरेखाला वाटल्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली होती. पण रमेशच्या अनेक अफेअरबद्दल कळल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.ससिरेखाला कंटाळून रमेश आणि त्याच्या सध्याच्या प्रेयसीने तिला मारण्याचा कट रचला होता. ससिरेखावर बलात्कार करून तिला मारण्यात आले असे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे तिचे मुंडके कापून त्यांनी तलावात फेकले होते आणि तिच्या उरलेल्या मृतदेहाचे तुकडे करून कचरा कुंडीत फेकले होते. ससिरेखा चित्रीकरणासाठी बाहेरगावी गेल्याचे त्याने अनेक दिवस तिच्या आईवडिलांना आणि मुलाला सांगितले होते. पण तिच्या पालकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिचे डोके तलावात फेकण्याआधी त्यांनी डोके जवळजवळ दोन दिवस घराच्या बाथरूममध्ये ठेवले होते.