Join us  

पत्नी तान्यासोबत रोमॅन्टिक झाला बॉबी देओल! व्हायरल होतोय फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 4:03 PM

बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘खरे प्रेम...आनंदाचा क्षण...अतिशय प्रेमळ पत्नी...’ असे कॅप्शन बॉबीने या फोटोला दिले आहे.

बॉबी व तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. दोघांना  दोन मुले आहेत. बॉबी व तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. होय, बॉबी अगदी पहिल्याच नजरेत तान्याच्या प्रेमात पडला होता. बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली.

हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांचेही परिवारातील लोक एकमेकांना भेटले अन त्यांच्यात लग्नाची बोलणी सुरू झाली.  

बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच ‘चट मंगनी, पट ब्याह’उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे.  तान्या डिझायनर स्वत: एक डिझाईनर आहे.

टॅग्स :बॉबी देओल