Join us

BMC Election 2017: मतदान करणे ही आपली जबाबदारी म्हणत सेलिब्रटींनी केले मतदान करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:36 IST

एकीकडे शूटिंगमध्ये बिझी असणारे सेलिब्रेटी आज घराबाहेर पडत आपल्या मतादानाचा हक्क बजावताना दिसले. त्यात अनुष्का शर्माने सकाळी वेळेत वेळ ...

एकीकडे शूटिंगमध्ये बिझी असणारे सेलिब्रेटी आज घराबाहेर पडत आपल्या मतादानाचा हक्क बजावताना दिसले. त्यात अनुष्का शर्माने सकाळी वेळेत वेळ काढून आपले मतदान केले.इतकेच नाहीतर मुंबईकरांनीही योग्य त्याच उमेदवाराला आपले मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. आज माझ्या दिवसांची सुरूवात मी मतदान करून केली आहे.मतदान करणेही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि आपला हक्क बजावा असे सांगत तिने तिचा एक सेल्फी फोटोही सोशल मीडियावर अपडेट केला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा ज्येष्ठ अभिनेत्री रेखाअनुष्काप्रमाणे रेखा यांनीही आपल्या दिवसांची सुरूवात मतादान करून केली आहे. ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान करत त्या घराबाहेर पडल्या  आणि मतदान करताना दिसल्या.झोया अख्तरदुसरीकडे सिनेदिग्दर्शिका आणि लेखिका झोया अख्तरनेही वेळ न घालवता  मतदान करताना दिसली. एक छानसा सेल्फी पोस्ट करत नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.अभिनेता पुष्कर श्रोत्रीमतदान करण्यासाठी बॉलिवूड सेेलिब्रेटींप्रमाणेच मराठी सेलिब्रेटीं मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यांनीही मतदानाचे महत्त्व समजावत  नागरिकांना मतदान करण्यास आवाहन करतायेत.अभिनेता पुष्कर श्रोत्री याने ''मी मतदान केलं... मतदान म्हणजे कर्तव्य,जबाबदारी आणि त्यापेक्षा माझ्यासाठी एक सोहळा... आता पुण्यात 'हसवाफसवी' चा प्रयोग करायला निश्चित!'' असे म्हणत उत्साहात मतदान केल्यानंतर एक फोटोही अपडेट केला आहे.अभिनेत्री रेणूका शहाणे''आज अनेक ठिकाणी महानगर पालिकेचे मतदान सुरू आहे.मी मतदान करून माझा नागरिक हक्क बजावलेला आहे.तुम्हीही घराबाहेर पडून मतदान केंद्राकडे जा आणि मतदान करा.फक्त आजच मत देऊ नका, तर पुढेही येणा-या इलेक्शनमध्ये आपले मत व्यक्त करत राहा.हा आपला नागरिक हक्क आहे. जो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे.तो बजावायलाच पाहिजे आपण जर जबाबदार नागरिक असू तर आपले राजकारणीही बेजबाबदारपणे वागूच शकणार नाही.देश घडवायचा आसेल तर सगळ्यांत आधी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे.त्यामुळे आपली जबाबदारी ओळखा आणि त्वरित जाऊन मतदान करा'' असे आवाहन अभिनेत्री रेणूका शहाणेने केले आहे. अभिनेता सुयश टिळकतर सुयश टिळक फक्त एकटाच घराबाहेर पडला नाहीतर आपल्या कुटुबियांसह जाऊन त्यांने आपला मतादानाचा हक्क बजावला आहे.तर सोनाली कुलकर्णीनेही 'हिच ती संधी आहे महाराष्ट्र घडवण्याची' म्हणत मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलंय अगदी हटक्या स्टाइलने आणि ग्लॅमरस अंदाजात सोनाली आवाहन करताना दिसतेय.एक फोटो काढत 'कम बी अ स्टार,वोटींग इज अ ग्लॅमसर' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.'वोट कर महाराष्ट्र' म्हणत ग्लॅमरस अंदाजात मतदान करण्याचे आवाहन करताना सेलिब्रेटी दिसतायेत.