Join us  

'बिवी हो तो ऐसी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:43 PM

१९८८ साली प्रदर्शित झालेला 'बिवी हो तो ऐसी' चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ठळक मुद्देसलमान खानने 'बिवी हो तो ऐसी' चित्रपटातून केले पदार्पण

१९८८ साली प्रदर्शित झालेला बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा चित्रपट 'बिवी हो तो ऐसी'ला तीस वर्षे पूर्ण झाली. या सिनेमातून सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजवरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका साकारत या प्रवासात रोमँटिक नायक ते बॉलिवूडचा सर्वांत आवडता अॅक्शन हिरो असा त्‍याचा कायापालट झालेला आपण पाहिलेला आहे. सलमानचा शक्तिशाली लुक, आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व व स्‍क्रीनवरील त्‍याचे मोहक वावरणे साजरे करण्‍याकरिता सोनी मॅक्स२ सलमानचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'बिवी हो तो ऐसी' चित्रपट २५ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता सोनी मॅक्स २ वाहिनीवर पाहता येणार आहे. 

'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटात मिसेस भंडारी (बिंदू) यांची आपल्‍या कुटुंबावर असलेली दहशत व जरब पहायला मिळते. पती (कादर खान) व मोठा मुलगा सुरज (फारुख शेख)वर यांच्यावर जणू त्या अधिपत्‍यच गाजवत असतात. इतकंच नाही दत्‍तक मुलीला त्या अगदी मोलकरणीप्रमाणे वागणूक देत असतात. धाकटा मुलगा विकी (सलमान खान) याचे मात्र त्या भरपूर लाड करतात. आयुष्यात आईच्‍या अतीव हस्‍तक्षेपामुळे कंटाळलेला सुरज अचानक काही दिवसांसाठी गायब होतो आणि आपली पत्‍नी म्‍हणून शाहू (रेखा) नावाच्‍या एका मुलीला घेऊनच परततो. शाहूच्‍या आगमनामुळे, आपली दहशत संपुष्‍टात येईल की काय असे मिसेस भंडारी यांना वाटू लागते. कारण ती हळूहळू घरातील सर्वांचे मन जिंकते आणि मिसेस भंडारी यांना धडा शिकवण्‍याचे ठरवते. सलमानच्‍या पहिल्या सिनेमातील अभिनय पाहण्यासाठी 'बिवी हो तो ऐसी' हा चित्रपट पाहावा लागेल. 

टॅग्स :सलमान खान