Join us

BIRTYHDAY SPECIAL : बोमन इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 10:25 IST

बोमन इराणी हे नाव हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांसाठी अपरिचित नाही. आपल्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या बोमनने मागच्या एक-दीड दशकांमध्ये स्वत:चे ...

बोमन इराणी हे नाव हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांसाठी अपरिचित नाही. आपल्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या बोमनने मागच्या एक-दीड दशकांमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पाहुण्या कलाकाराची भूमिका असो वा मुख्य खलनायकाची, बोमन प्रत्येक रोलमध्ये जीव ओतून काम करतो. ‘मुन्नाभाई’मधील डॉ. अस्थाना असो वा ‘३ इडियटस्’चा प्रिन्सिपल ‘व्हायरस’, त्याची व्यक्तीरेखा कायम स्मरणात राहते. अशा या चतुरस्र अभिनेत्याचा आज ५७वा वाढदिवस.बोमन म्हणतो, इतर दिवसांप्रमाणेच हा एक दिवस आहे. मला त्याचे विशेष अप्रुप वाटत नाही. या दिवशी माझे काही जुने मित्र घरी येतात आणि आम्ही स्वादिष्ट पारसी जेवणावर ताव मारत बालपणातील गप्पांमध्ये रंगून जातो. अशा साध्या पद्धतीनेच माझे बर्थडे सेलिब्रेशन असते.बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटी होण्याची त्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी रंजक नाही. अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस बॉयचे काम करत असे. तसे पाहिले तर कॉलेजजीवनापासून त्याला अ‍ॅक्टिंगची आवड होती.                                                                       ३ इडियटस् : प्रिन्सिपल ‘व्हायरस’ऐंशीच्या दशकात त्याने हंसराज सिधियाच्या मार्गदर्शनाखाली स्टेज अ‍ॅक्टिंग शिकली. नव्वदच्या दशकात व्यवसाय म्हणून फोटोग्राफी करताना शामक दावरने त्याची भेट लिजेंडरी थिएटर अ‍ॅक्टर अ‍ॅलिक्यू पॅडम्सीशी घालून दिली. अखेर २००० सालापासून त्याने पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला.बोमनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल हे रंजक फॅक्टस् :* त्याने वयाच्या ३५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. विशेष म्हणजे ४४व्या वर्षी त्याला बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली.* त्याने केलेले ‘महात्मा वि. गांधी’ आणि ‘आय अ‍ॅम नॉट बाजीराव’ ही दोन नाटके मुंबईतील इंग्लिश थिएटरच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध नाटकांपैकी आहेत.                                                                      मुन्नाभाई एम.बी.बी.एस : डॉ. अस्थाना* चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वी त्याने सुमारे १२ वर्षे फरसाणची दुकान चालवली.* बोमन प्रोफेशनल फोटोग्राफरदेखील आहे. त्याने‘ वर्ल्ड बॉक्सिंग’ आणि ‘मिस इंडिया’सारखे इव्हेंटस् कव्हर केलेले आहेत.* फारसा प्रसिद्ध अभिनेता नसतानाही विधू विनोद चोप्राने त्याला ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ची पटकथा पूर्ण होण्याआधीच दोन लाख रुपये मानधनासह कास्ट केले होते.* बोमन आणि फराह खान हे बेस्ट फ्रेंड आहेत. परंतु बोमन आणि शाहरुखसुद्धा खूप जवळचे मित्र आहेत हे बºयाच जणांना माहित नाही.