Join us  

B'Day: जेव्हा विनोद खन्ना यांनी मागितला होता श्रीदेवीला आधार, वाचा न ऐकलेले किस्से.....

By अमित इंगोले | Published: October 06, 2020 11:11 AM

एकेकाळी विनोद खन्ना अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे अभिनेते ठरले होते. पण नशीबाला वेगळंच मान्य होतं. विनोद खन्ना यांनी आध्यात्माचा मार्ग निवडला. चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी...

(Image Credit : nytimes.com)

विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावरमध्ये झाला होता. विनोद खन्ना यांना अभिनेते-निर्माता सुनील दत्त यांनी खलनायक म्हणून लॉन्च केलं होतं. पण आपल्या गूड लूकमुळे ते लवकरच हिरो झाले. इतकेच नाही तर एकेकाळी विनोद खन्ना अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे अभिनेते ठरले होते. पण नशीबाला वेगळंच मान्य होतं. विनोद खन्ना यांनी आध्यात्माचा मार्ग निवडला. चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या काही खास गोष्टी...

सत्तरचं दशक संपता संपता विनोद खन्ना सुपरस्टार होण्यासोबत ओशोचे शिष्यही झाले होते. ज्या दिवसांमध्ये ते कुर्बानी आणि द बर्निंग ट्रेनचं शूटींग करत होते तेव्हा ते दर आठवड्यात शुक्रवारी पुण्याला ओशो म्हणजेच रजनीश आश्रमात जात होते. 

त्यानंतर ओशो अमेरिकेला शिफ्ट झाले होते आणि आपल्या शिष्यांनाही तिथे बोलवून घेतलं. विनोद खन्ना यांनीही सगळं काही सोडून अमेरिकेचा मार्ग धरला होता. त्यांनी परिवार सोडून ओशोसोबत राहण्याचा मार्ग निवडला होता. ते अमेरिकेतील आश्रमात माळीचं काम करायचे.

ओशो यांच्यासोबत झालेल्या वादानंतर चार वर्षांनी विनोद खन्ना पुन्हा मुंबईला परत आले. पण तेव्हा ना त्यांच्याकडे पैसा होता ना घर. पत्नीसोबत घटस्फोटही झाला होता. पुन्हा सिनेमासाठी संघर्ष करणे सोपं नव्हतं. त्यांच्या काळातील हिरोंचं करिअर संपत आलं होतं आणि जुन्या हिरोईनही बाहेर पडल्या होत्या.

जेव्हा ते परतले तेव्हा त्यांना सल्ला देण्यात आला की, त्यावेळची नंबर वन हिरोईन श्रीदेवीसोबत त्यांनी काम करावं. त्यावेळी सगळ्या हिरोंना श्रीदेवीसोबत काम करायची इच्छा होती. विनोद खन्ना यांनी श्रीदेवीला मेसेज पाठवला की, त्यांना तिच्यासोबत काम करायचं. पण त्या मेसेजचा काही रिप्लाय आला नाही. विनोद खन्ना यांना वाटत होतं की, श्रीदेवीसोबत काम करून करिअर पुन्हा मार्गावर आणता येईल.

जेव्हा विनोद खन्ना यांना समजलं की, यश चोप्रा श्रीदेवीसोबत चांदनी सिनेमा करत आहेत ते त्यांच्याकडे पोहोचले. त्यांनी यश चोप्रा यांना या सिनेमात काम मागितलं. यश चोप्राने ऋषी कपूरला आधीच फायनल केलं होतं. श्रीदेवीच्या बॉसचा एक छोटा रोल शिल्लक होता. विनोद खन्ना यांनी हा रोल करायला होकार दिला. 

सिनेमा तयार होता होता विनोद खन्ना यांचा रोलही मोठा झाला. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि विनोद खन्ना यांची दुसरी इनिंगही सुरू झाली. त्यानंतर त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं.  

टॅग्स :विनोद खन्नाबॉलिवूडश्रीदेवी