Join us

Birthday Special:वहिदा रेहमान यांना पाहताच अभिनेत्यांची व्हायची बोलती बंद,जाणून घ्या यामागचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 14:36 IST

आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं तब्बल  पाच दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान. चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न ...

आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं तब्बल  पाच दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान. चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे वहिदा रेहमान.वहिदा रहमान आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहे.याचनिमित्ताने बॉलिवूडकरांनी आपापल्या अंदाजात वहिदाजींना शुभेच्छां  दिल्या आहेत.'प्यासा', 'साहेब,बिवी और गुलाम, 'गाइड', 'तिसरी कसम' यांसारख्या अनेक सिनेमातून वहिदा रेहमान यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने फॅन्सची मनं जिंकली.जुन्या जमान्यातच नाही तर दिल्ली-6, विश्वरुपम सारख्या सिनेमातही वहिदा रेहमान यांनी आपल्या अभिनयाने छाप पाडलीय..असे म्हणतात, की वहिदा इतक्या देखण्या होत्या की चित्रपटाच्या शूटवेळी त्यांचे सौंदर्य पाहून त्यांचे अभिनेता बऱ्याचदा डायलॉग्जही विसरुन जात. हिरोईन, आई, आजी अशा अनेक भूमिका समर्थपणे निभावणा-या वहिदाजींनी आता बॉलिवूडला बायबाय केलं. काही वर्षापूर्वी वहिदा रेहमान यांच्यावरील नसरीन मुन्नी कबीर यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च करण्यात आलं होते. त्यावेळी वहिदा रेहमान यांनी बॉलिवूडमधून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली होती.बॉलिवूडचा चौहदवी का चाँद म्हणजे वहिदा रेहमान यांनी बॉलिवूडला रामराम केला असला तरी त्यांचा अभिनय आणि अनेक बदलांच्या साक्षीदार असलेल्या वहिदाजी कायमच नव्या पीढीसाठी आयडॉल बनल्या आहेत.खरंतर वहिदा यांना चित्रपटात येण्याची अजिबात इच्छा नव्हती.वहिदा यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण केवळ वयाच्या 16 व्या वर्षीच त्या अचानकपणे चित्रपटसृष्टीत आल्या आणि अल्पावधीत स्टारही बनल्या. त्यांना डान्सची फार आवड होती.1966 साली 'गाईड' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार, त्यानंतर 1968 साली 'नीलकमल' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार आणि 1994 मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.वहिदा रहमान यांना फोटोग्राफी फार आवडते.त्यांना खासकरुन प्राण्यांचे फोटोज् घ्यायला फार आवडते. आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत वहिदा यांनी अभिनय केला आहे. त्यातील देव आनंद त्यांच्या आवडीचे कलाकार आहेत.वहिदा रहमान गुरु दत्त यांना त्यांचा मेंटॉर मानतात. गुरु दत्त यांनी वहिदा यांना 'गाईड' चित्रपटात दिलेला ब्रेक वहिदा रहमान यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला.