Join us  

‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 8:00 AM

आज  प्रिती झिंटाचा वाढदिवस.

ठळक मुद्दे2016 मध्ये  प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली.

गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज (31 जानेवारी) प्रितीचा वाढदिवस. आज प्रिती बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रितीला अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.

 

31 जानेवारी 1975 ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ती 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. यात तिची आईदेखील जखमी झाली होती. दोन वर्षे तिची आई बिछाण्यावर होती. या दोन वर्षांत अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या घटनेने प्रितीचे अख्खे आयुष्य बदलले. पण प्रितीने हार मानली नाही.

मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केले. लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. याचकाळात तिची निर्माते शेखर कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिला चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या अ‍ॅड एजन्सीची एक जाहिरातही ऑफर केली.

शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण  पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर 1998 मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती केवळ 20 मिनिटे दिसली. पण या 20 मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

प्रितीचे पर्सनल लाईफही बरेच चर्चेत राहिले. यातील सलमान व प्रितीचा वाद चांगलाच गाजला होता. सलमानने आपल्या आवाजात टेप रेकॉर्डिंग करून प्रीतीला ब्लॅकमेल केले होते. यानंतर प्रीतीने सलमानविरोधात केस दाखल केली होती. पोलिस तपासानंतर हे टेप बनावट असल्याचे समोर आले. ही घटना ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाच्या दरम्यान घडली होती. मात्र, आजदेखील प्रीती आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत. 

दिग्दर्शक शेखर कपूरसोबत प्रिती नात्यात असल्याच्या चर्चा सुरुवातीच्या काळात खूप गाजल्या.  इतकेच नाही तर शेखर कपूर यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी सरळसरळ प्रितीमुळे आपला संसार मोडल्याचा आरोप केला होता. सुचित्राने ‘मॅनइटर’ (पुरूषांना खाणारी) नामक एक कविताही लिहिली होती. ही कविता तिने प्रितीसाठी लिहिल्याचे मानले गेले होते.

नेस वाडियासोबतचे प्रितीचे रिलेशनशिप जगजाहिर होते. ती आणि नेस वाडिया दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण पुढे हे रिलेशनशिप वेगळ्याच वळणावर गेले.तिने वाडियावर शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. वाडियाने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. 

2016 मध्ये  प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. आज प्रिती बॉलिवूडच्या पार्ट्यांना दिसते. पण तशी ती आपल्या संसारात अधिक आनंदी आहे.

टॅग्स :प्रीती झिंटा