अभिनेत्री नेहा धूपिया हिचा आज (27 ऑगस्ट ) वाढदिवस. सध्या नेहा पती अंगद बेदीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करतेय. या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समुद्र किना-यावर पतीसोबत मौज करताना तिच्या चेह-यावरून आनंद ओसंडून वाहतो आहे.
रित्विक भट्टाचार्य
रित्विक एक स्क्वॅश खेळाडू आहे. नेहा व रित्विक एक-दोन नाही तर दहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. नेहा मिस इंडिया व्हायच्या आधी ती रित्विकला भेटली होती. इथूनच दोघांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि रित्विकने मॉडेल पिया त्रिवेदीसोबत लग्न केले.
युवराज सिंग
2014 मध्ये नेहा आणि युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. दोघेही अनेकदा इव्हेंला एकत्र दिसू लागले. पण दोन महिन्यांतच नेहाने युवराजला डेट करत असल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.
जेम्स सिल्वेस्टर
जेम्ससोबतच्या ब्रेकअपमधून सावरायला बरीच वर्षे लागली. अंगद बेदीने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले. त्याला होकार देण्यासाठी नेहाने चार वर्षांचा वेळ घेतला. अखेर वयाच्या 37 व्या वर्षी स्वत:पेक्षा दोन वर्षे लहान अंगदसोबत ती लग्नबेडीत अडकली.