Join us  

Birthday Special : शब्दांचे जादुगार गुलजार यांच्या काही खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 9:59 AM

एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद...दूसरा सपना देखने के हौसले को ‘ज़िंदगी’ कहते हैं... भावनांची ही अशी मांडणी आणि शब्दांची जादुगरी केवळ गुलजारच करु शकतात यात कुणाचही दुमत नसावं.

एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद...दूसरा सपना देखने के हौसले को ‘ज़िंदगी’ कहते हैं... भावनांची ही अशी मांडणी आणि शब्दांची जादुगरी केवळ गुलजारच करु शकतात यात कुणाचही दुमत नसावं. लाखोंच्या जखमांवर मलमाचं काम करणारे शब्द गुंफणाऱ्या या शब्दांच्या जादुगाराचा आज वाढदिवस. संपूर्ण सिंह कालरा म्हणजेच गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता. आज हे गाव पाकिस्तानात आहे. 

गुलजार यांचं वय कितीही वाढलं आणि आजची पिढी कितीही मॉडर्न झाली तरी त्यांच्या शब्दांवर प्रेम करणारे कमी होत नाहीयेत. आजच्या तरुणाईच्या मनाचा विचार करुन ते आजही त्यांच्या गाण्यात मॉडर्न विश्व दाखवत आहेत. ही त्यांच्या गाण्यांची खासितय आहे. जितकी त्यांची जुनी गाणी लोकप्रिय आहेत तितकीच त्यांची नवीन गाणी तरुणाईने डोक्यावर घेतली. 

बालपणापासूनच गुलजार यांनी लिहायला सुरुवात केली होती. पण त्यांच्या वडिलांना हे आवडत नसे. मात्र गुलजार यांनी कधी लिहिणे थांबवले नाही आणि ते आज बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहेत. गुलजार यांना २० वेळा फिल्मफेअर आणि पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चला जाणून घेऊ शब्दांच्या या जादुगाराबद्दल आणखीही काही खास गोष्टी.....

१) गुलजार हे नेहमी पांढरे कपडे का घालतात असा प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. त्यांनी सांगितले होते की, पूर्वी त्यांच्याकडे पांढऱ्या कपड्यांचे दोन जोड होते. दररोज ते एक धुवायला टाकायचे आणि एक वापरायचे. कॉलेजपासूनही ते हेच कपडे वापरायचे. तेव्हापासून त्यांना हेच पांढरे कपडे वापरण्याची आवड आहे. 

२)  दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले गुलजार साहेब हे जेव्हा खालसा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा ते पार्ट टाइम जॉब म्हणून एका गॅरेजवर काम करायचे. इथे ते गाड्यांना रंग देण्याचं काम करत असतं. तर रिकाम्या वेळात ते कविता लिहित असतं. 

३) गुलजार यांनी बिमल रॉय यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम केलं. एस.डी.बर्मन यांच्या 'बंदिनी' पासून त्यांनी गीतकार म्हणून काम सुरु केलं. त्यांचं पहिलं गाणं 'मोरा गोरा अंग...' हे आहे. 

४) दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचा पहिला सिनेमा 'मेरे अपने' हा होता. हा सिनेमा १९७१ मध्ये आला होता. हा सिनेमा एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता. 

५) गुलजार यांच्या बहुतेक सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक बघायला मिळतो. त्यांचं म्हणनं आहे की, भूतकाळ दाखवल्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. याची झलक 'किताब', 'आंधी' आणि 'इजाजत' या सिनेमात बघायला मिळाली. 

६) गुलजार हे १९७३ मध्ये आलेल्या 'कोशिश' सिनेमासाठी साइन लॅंग्वेज शिकले होते. कारण हा सिनेमा मूक-बधीर विषयावर आधारित होता. यात संजीव कुमार आणि जया भादुरीने काम केलं होतं. 

७) त्यांनी दिग्दर्शित केलेला 'हू तू तू' फ्लॉप झाला तेव्हा गुलजार हे डिप्रेशनमध्ये गेले होते. यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी शायरी आणि कथांकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं. 

८) गुलजार यांना टेनिस खेळण्याची खूप आवड आहे. या वयातही ते रोज सकाळी टेनिस आवर्जून खेळतात. 

९) १९७३ मध्ये गुलजार यांनी अभिनेत्री राखी यांच्याशी लग्न केले. पण त्यांची मुलगी मेघना दीड वर्षांची असतानाच दोघे वेगळे झाले. मात्र दोघांनी घटस्फोट घेतला नाही. मेघनाला दोघांचं प्रेम मिळालं.

टॅग्स :गुलजारसेलिब्रिटी