Join us  

२७ वर्षाने मोठ्या दिग्दर्शकासोबत हेलनने केलं होतं लग्न, घटस्फोटानंतर मिळाली होती सलीम खानची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 11:28 AM

१९ वर्षांची असताना हेलनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. लोकांना तिने वेड लावलं होतं. आपल्या बहारदार डान्सने ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली होती.

५० च्या दशकात हिंदी सिनेमांमध्ये ग्लॅमरला सुरूवात झाली होती. हा तोच काळ होता जेव्हा बॉलिवूड सिनेमांमध्ये आयटम सॉंगला सुरूवात झाली होती. याच काळात प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री हेलनचा उदय झाला. १९ वर्षांची असताना हेलननेबॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. लोकांना तिने वेड लावलं होतं. आपल्या बहारदार डान्सने ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली होती. तिचा जन्म २१ नोव्हेंबर १९३८ ला बर्मामध्ये झाला होता.

हेलनची आई बर्मामध्ये राहत होती. तिचा एक भाऊ आणि एक सावत्र आई जेनिफर होती. हेलनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईने एका ब्रिटीश सैनिकासोबत दुसरं लग्न केलं होतं. पण एका युद्धात हेलनचे सावत्र वडिलही मारले गेले आणि इथूनच तिचा वाईट काळ सुरू झाला.

भटकत भटकतत हेलनचा परिवार कोलकात्याला पोहोचला. इथे तिची आई नर्सचं काम करत होती. पण घर चालवण्यासाठी पुरेसे पैसे अजूनही मिळत नव्हते. यादरम्यान हेलनच्या आईची भेट कुक्कू मोरेसोबत झाली. ती सिनेमात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होती. कुकूने हेलनला सिनेमात डान्सरचं काम मिळवून दिलं.

१९ वयाची असताना हेलनला हावडा सिनेमात मोठा ब्रेक मिळाला होता. या सिनेमातील गाणं मेरा नाम 'चिन चिन चू' ने हेलनचं नशीब बदललं. यानंतर ती बॉलिवूडची पहिली आणि सर्वात मोठी आयटम गर्ल बनली. १९५७ मध्ये हेलनने तिच्याहून २७ वर्षाने मोठ्या दिग्दर्शक पीएन अरोडासोबत लग्न केलं. पण काही वर्षात हे लग्न मोडलं. हेलनच्या ३५व्या वाढदिवशी तिचं हे १६ वर्षाचं नातं तुटलं.

पतीला घटस्फोट दिल्यानंतर हेलन पुन्हा एका वाईट परिस्थितीत आली. नंतर १९६२ मध्ये 'काबिल खान' सिनेमाच्या सेटवर तिची भेट सलीम खान यांच्यासोबत झाली. सिनेमात काम मिळत नसल्याने हेलन हैराण होती. या कठिण काळात सलीम खान तिचा आधार बनले. सलीम खान यांनी हेलनला सांभाळलं आणि विवाहित असूनही तिच्याशी दुसरं लग्न केलं. 

टॅग्स :हेलनबॉलिवूड