Join us  

Birthday Special : या कारणांमुळे एकता कपूरला करावा लागतो वादांचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 7:15 AM

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. एकताने मिळवलेले यश सर्वांनाच माहिती आहे. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये तिची गणना केली जाते.

ठळक मुद्देचाळीशी ओलांडूनही एकता अविवाहित आहे. अलीकडे एका मुलाखतीत एकता तिच्या लग्नाबद्दल बोलली होती.

भारतीय टेलिव्हिजची क्वीन म्हटले की, एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो, तो म्हणजे एकता कपूरचा. एकताचा आज (7 जून) वाढदिवस. 7 जून 1979 रोजी अभिनेते जितेन्द्र आणि शोभा कपूर यांच्या पोटी जन्मलेली एकता एकदिवस बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाईल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण आज एकता केवळ टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन नाही तर टेलिव्हीजनपासून सिनेसृष्टीत काम करणाºया अनेक कलाकारांची गॉड मदरही आहे. विद्या बालन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांना एकताने ब्रेक दिला होता.

वयाच्या 19 व्या वर्षी एकताने करिअरची सुरुवात केली.  आई शोभा कपूरसोबत मिळून तिने बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली. इतक्या वर्षांत दोघी मिळून बालाजीचे साम्राज्य सांभाळत आहेत. ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यानंतर तिने अनेक सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन केले.

एकताने टीव्हीवर सास-बहू ड्रामा आणला. शिवाय त्यात बोल्ड कंटेंट आणून एक धाडसी पाऊल उचलले.  चित्रपटातील बोल्ड सीन्ससाठी अ‍ॅक्टर्सचा नकार टाळण्यासाठी आणि सेन्सॉरच्या कात्रीतून वाचण्यासाठी एकताने काय करावे, तर अ‍ॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटी क्लॉज टाकला. ट्रिपल एक्ससोबत तिने हा क्लॉज आणला. तिच्या या क्लॉजवर बरीच टीका झाली.

एकता कपूरचा एस्ट्रोलॉजी आणि न्युमरोलॉजीवर गाढ विश्वास आहे. त्यामुळेच  एकता सर्रास काळ्या रंगाचे कपडे घालते. अनेक इव्हेंट्स, कार्यक्रमांना एकता काळे कपडे घालून जाते.  कोणत्यातरी एस्ट्रोलॉजरने तिला काळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून ती बहुतेकदा काळ्या रंगाचे कपडे घालते. इतकेच नाही तर सर्व बोटांत स्पेशल अंगठीही  परिधान करते.

एकताने टेलिव्हिजन तसेच चित्रपट क्षेत्रामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु एका गोष्टीमुळे तिला वादांचा सामना करावा लागतो. ती गोष्ट म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स. आपल्या विचित्र ड्रेसिंग फॅशनमुळे ती चर्चेचा विषय बनते. कधीकधी ती एवढे विचित्र ड्रेस परिधान करते की, सर्वांचे लक्ष फक्त तिच्या ड्रेसकडेच जाते.

चाळीशी ओलांडूनही एकता अविवाहित आहे. अलीकडे एका मुलाखतीत एकता तिच्या लग्नाबद्दल बोलली होती. माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. पण मी लग्नासाठी अद्याप तयार नाही. माझे अनेक मित्र ज्यांनी लग्न केले होते, ते आता सिंगल झाले आहेत. प्रतीक्षा यादी बरीच मोठी आहे. मी सुद्धा या यादीत आहे, असे ती म्हणाली होती. नुकतीच एकता सरोगसीद्वारे आई झाली. 

टॅग्स :एकता कपूर