* रणवीर सिंगचा जन्म 6 जुलै 1985 साली झाला आहे. रणवीरचे पूर्ण नाव रणवीर सिंग भावनानी आहे. खूप कमी जणांना हे माहिती आहे की रणवीर सोनम कपूरचा भाऊ आहे. तो सोनमच्या मावशीचा मुलगा आहे.
*रणवीर सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या नावापुढे भावनानी लावण्याचे सोडले. कारण त्याला वाटते हे नाव खूपच मोठे होते आणि इंडस्ट्रीमध्ये त्याला ब्राँड म्हणून स्वत:चे प्रस्थ निर्माण करण्यास या नावासोबत अडथळे आले असते.
* रणवीरने ब्लूमिंगटनमधल्या 'इंडियाना युनिव्हर्सिटी'तून बॅचलरची डिग्री घेतली आहे. त्यावेळी तो थिएटरमध्ये देखील काम करत होता.
* अभिनेत्या होण्याआधी रणवीरने जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर म्हणून देखील काम केले आहे. अभिनया व्यक्तिरिक्त त्याला क्रिएटीव्ह रायटिंगमध्ये करायला सुद्धा आवडते.
* आपल्या भूमिकेच्या मागणीनुसार रणवीर नेहमीच त्याचा डाएट प्लॉन सेट करतो. तो जेवणात कार्बोहाइड्रेड असलेल्या पदार्थ खाणे टाळतो. प्रोटीन्सचा भरपूर समावेश त्याच्या जेवणात असतो. तो दिवसातून दोनदा एक्ससाईज करतो.
* रणवीर सिंग लहानपणी खूप जाडा होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षांपासून त्याने वजन कमी करायला सुरुवात केली होती.
* रणवीर सिंगच्या वडिलांचा रिअल इस्टेट बिझनेस आहे. रणवीर आपल्या आईच्या खूप जवळ आहे, म्हणून त्याला मम्माज बॉय म्हणतात.
* त्यांने लुटेरा चित्रपटाच्या रिलीजच्या आधी आपल्या आईल महागडी कार गिफ्ट दिली होती.
* रणवीरला लहानपणापासूनच डान्स आणि अक्टिंगची आवड आहे. लहानपणी एका बर्थडे पार्टी त्याच्या आजीने त्याला सगळ्यांचे मनोरंजन करायला सांगितले होते त्यावेळी रणवीर लॉनमध्ये जाऊन बराचवेळ डान्स केला होता.