Join us  

धर्मेंद्र यांच्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न, शोभा कपूरला सोबत घेऊन केला होता जोरदार हंगामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 11:23 AM

धर्मेंद्र आणि शोभा यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते थेट चेन्नईला पोहोचले.

बॉलिवूडचे ही-मॅन म्हटले जाणार्‍या दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. छोट्या गावातून बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा संघर्ष खरोखरच स्तुत्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने ज्या प्रकारे आपला ठसा उमटवला तो बर्‍याच वर्षे लक्षात राहील. धर्मेंद्र यांच्या आयुष्यात यश आणि वाद कायम राहिले. दोन विवाह करणार्‍या धर्मेंद्रने जितेंद्र यांचा पत्ता कट करुन  हेमा मालिनींसोबक लग्न केले. हा खास किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

 

धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना शहरातील नसरली या छोट्या गावात झाला. जाट कुटुंबात जन्मलेला धर्मेंद्र लहानपणापासूनच निरोगी होता. 19व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी विवाह केले. त्यावेळी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नव्हते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले, दोन मुलं आणि दोन मुली. बॉलिवूडमध्ये येताच ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले.

 

 हेमा मालिनी यांना धर्मेंद यांच्याशिवाय जितेंद्र आणि संजीव कुमारवरही आवडायचे. त्याच दरम्यान, अशी बातमीही आली की जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते चेन्नईमध्ये आहेत. त्यावेळी जितेंद्र शोभा कपूर यांच्यासोबत नात्यात होते.

धर्मेंद्र आणि शोभा यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते थेट चेन्नईला पोहोचले. ते दोघे तिथे गेल्यावर सगळ्याच गोष्टी अतिशय अवघड झाल्या. हेमा यांच्या वडिलांनी चिडून धर्मेंद्र यांना बाहेर काढले. पण धर्मेंद्र कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. अखेर हेमा यांच्यासोबत त्यांना एकांतात बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी हेमा आणि जितेंद्र यांच्या कुटुंबातील मंडळी, स्वतः जितेंद्र सगळेच रूमच्या बाहेर उभे होते. हेमा यांनी जितेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याची चूक करू नये अशी विनंती धर्मेंद्र त्यांना करत होते. अखेरीस हेमा यांनी रूमच्या बाहेर येऊन सगळ्यांना जितेंद्र आणि त्यांच्या लग्नासाठी काही दिवस थांबण्याची विनंती केली. पण हा जितेंद्र यांच्यासाठी अपमान होता. त्यांचे पालक देखील प्रचंड चिडले होते. सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ते लगेचच तिथून निघून गेले. शोभा कपूर यांनी तिकडे जाऊन चांगलाच हंगामा केला होता. 

काही काळानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले तर जितेंद्र शोभा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे जितेंद्र यांच्या लग्नाला धर्मेंद्र यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीजितेंद्र