Join us  

Birthday Special : 43 वर्षांची ही हिरोईन आजही आहे ‘हॉट’; पण ‘ब्रेक’ पडला महाग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 3:06 PM

आज ती 43 वर्षांची झाली. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो.

ठळक मुद्देचित्रांगदा ग्लॅमरस आहे. पण   तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याचे कारण तिने सांगितले होते.

बॉलिवूडची ग्लॅमगर्ल चित्रांगदा सिंग हिचा आज वाढदिवस. चित्रांगदाने कधीच वयाची चाळीशी ओलांडली. आज ती 43 वर्षांची झाली. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो. दीर्घकाळापासून चित्रांगदा बॉलिवूडमधून गायब आहे. पण तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर अनेकदा धुमाकूळ घातला आहे.  

30 आॅगस्ट 1976 रोजी जन्मलेल्या ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’ या सिनेमामधून करिअरला सुरुवात केली.उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका जाट कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव निरंजन सिंह असून ते भारतीय सेनामध्ये अधिकारी होते आणि भाऊ दिग्विजय सिंह एक गोल्फर आहे. 

चित्रांगदाचे हे फोटो पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. सन 2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधावासोबत चित्रांगदाने लग्नगाठ बांधली. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. कालांतराने दोघांचाही घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा आहे. असे म्हणतात की, मुलाच्या जन्मानंतर चित्रांगदाला सिनेमात परतायचे होते. पण तिच्या पतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे दोघांचे वाद विकोपाला गेलेत. काहींच्या मते, चित्रांगदाच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले.

 चित्रपटात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंगनंतर चित्रांगदाने म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले.  

  तिने नेहमीच सिनेमात विविध थाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘देसी बॉइज’ सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती.   यानंतर  इनकार, आय, मी और मै अशा अनेक सिनेमांत ती झळकली.

चित्रांगदा ग्लॅमरस आहे. पण   तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याचे कारण तिने सांगितले होते. ‘मी करिअरला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात अशी अनेक वळण आली ज्यांनी आयुष्याची प्राथमिकता बदलत गेल्या. मी सिनेमात पाऊल ठेवले आणि त्यानंतर तब्बल चार वर्षांचा ब्रेक घेतला.त्यानंतर मी पुन्हा एकदा सिनेमात आले आणि पुन्हा दोन वर्षांचा ब्रेक घेतला. संधी मिळत असताना मी त्या नाकारल्या. याचे परिणाम मला भोगावे लागले, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 

टॅग्स :चित्रांगदा सिंग