Join us  

birthday special : अनिल कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया यांनी दिला होता आजपर्यंतचा सगळ्यांत बोल्ड सीन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 4:23 AM

पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाने खळबळ उडवणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज (८ जून)वाढदिवस. पहिला चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर अचानक  ग्लॅमरच्या ...

पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाने खळबळ उडवणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज (८ जून)वाढदिवस. पहिला चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर अचानक  ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जाण्याचा निर्णय घेणा-या कदाचित डिंपल पहिल्याच. पहिला चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यानंतर तब्बल ११ वर्षांनंतर डिंपल यांचा दुसरा सिनेमा आला. आज जाणून घेऊ यात त्यांच्याबद्दलच्या काही रोचक गोष्टी...डिंपल यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. १९७३ मध्ये आलेल्या ‘बॉबी’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या पहिल्याचे चित्रपटाने  त्या एका रात्रीत स्टार झाल्या. यावेळी डिंपल केवळ १६ वर्षांच्या होत्या. या पहिल्या चित्रपटात त्यांच्या अपोझिट होते ऋषी कपूर. या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि तशा डिंपल व ऋषी यांच्या अफेअरच्या चर्चाही जोर धरू लागल्या.‘बॉबी’मध्ये डिंपल यांनी एका साध्या-भोळ्या मुलीची भूमिका केली. पण अतिशय मॉडर्न पद्धतीने. या चित्रपटात त्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसल्या. मग काय लोक या बोल्ड डिंपलच्या प्रेमात पडलेत. यानंतर अनेक डायरेक्टर डिंपल यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सूक होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.राजेश खन्नांसाठी सोडले करिअर‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच डिंपल यांची ओळख राजेश खन्नांशी झाली होती. राजेश खन्ना डिंपलच्या प्रेमात आकंठ बुडाले. इतके की ‘बॉबी’ रिलीज होण्याआधीच त्यांनी डिंपलसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. डिंपल   हा लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकल्या नाहीत आणि डिंपल यांनी स्वत:पेक्षा १५ वर्षे मोठ्या राजेश खन्नांशी लग्न केले.अन् पुनरागमनानंतर लावली हिट चित्रपटांची रांगखरे तर ‘बॉबी’ हिट झाल्यावर डिंपल यांच्या घरासमोर दिग्दर्शकांची रांग लागली होती. पण राजेश खन्ना यांनी डिंपल यांना लग्नानंतर चित्रपटांत काम करण्यास मनाई केली होती. यामुळे डिंपल यांनी बॉलिवूड व अभिनयापासून फारकत घेतली. राजेश खन्ना व डिंपल यांना दोन मुली झाल्यात. पण १९८२ मध्ये डिंपल व राजेश खन्ना यांच्यात मतभेद निर्माण झाले. दोघेही विभक्त होण्यापर्यंत हे वाद विकोपाला गेले.   १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर डिम्पल पुन्हा अभिनयाकडे वळल्या.  विश्वास बसणार नाही पण यानंतर डिंपल यांनी हिट चित्रपटांची रांग लावली.  ‘ऐतबार’, ‘लावा’, ‘अर्जुन’, ‘सागर’, ‘पाताल भैरवी’, ‘जाबांज’, ‘इंसानियत का दुश्मन’, ‘काश’, ‘साजिश’, ‘राम लखन’ असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिलेत.  ‘सागर’  (१९८५) चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.अन् सगळ्यांच्या नजरा झुकल्या‘सागर’ या चित्रपटाच्या वेळचाच एक किस्सा आजही ऐकवला जातो. या सिनेमाच्या सेटवर डिंपल यांच्यासोबत असे काही झाले की, सगळ्यांच्या नजरा लाजेने झुकल्या. या चित्रपटात डिंपल यांनी अनेक हॉट सीन्स दिले होते. चित्रपटात आंघोळ करतानाचा सीन शूट करताना हा प्रसंग घडला होता. सीन सुरू असताना डिंपल यांचा टॉवेल अचानक घसरला होता. या घटनेने डिंपल ओशाळल्या. त्यांच्यासोबत सेटवर हजर असलेल्या लोकांच्या मानाही खाली गेल्यात. या चित्रपटातील डिंपल यांचा टॉपलेस सीनही वादात सापडला होता.आजपर्यंतचा सगळ्यांत बोल्ड इंटिमेट सीन‘जांबाज’ या चित्रपटातही डिंपल यांनी कधी नव्हे इतके बोल्ड सीन दिले होते. अनिल कपूर हा यात त्यांचा हिरो होता. अनिल कपूर यांच्यासोबतचा या चित्रपटातील त्यांनी दिलेला इंटिमेट सीन आजपर्यंतचा सगळ्यांत बोल्ड सीन मानला जातो.सनीसोबतचे अफेअरडिंपल यांनी बॉलिवूडमध्ये बाप आणि मुलासोबत वेगवेगळ्या चित्रपटात हिरोईन म्हणून काम केले. होय, आधी डिंपल धर्मेन्द्र यांची हिरोईन बनल्या आणि यानंतर धर्मेन्द्र यांचा मुलगा सनी देओल याच्याशीही त्या आॅनस्क्रीन रोमान्स करताना झळकल्या. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या लव्ह अफेअरच्या बातम्याही त्या काळात बºयाच गाजल्या. अर्थात दोघांनीही या चर्चा नाकारल्या. याचदरम्यान काही वर्षांनंतर डिंपल व राजेश खन्ना यांच्यातील दुरावाही हळू हळू कमी व्हायला लागला.  ALSO READ : राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे या कारणामुळे झाले होते ब्रेकअप