Join us

बिप्स-करणचा फॅमिली क्लिक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 08:53 IST

 मागील आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकलेले नवदाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवण्यात बिझी आहेत. मित्र आणि ...

 मागील आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकलेले नवदाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवण्यात बिझी आहेत. मित्र आणि कुटुंबीय यांच्यासोबत दोघेही मस्त खुश आणि आनंदी दिसत आहेत.पण, आता असे वाटतेय की, हळूहळू ते आपल्या रूटीनकडे वळू लागले आहेत. बिपाशाने सेलिब्रेशनचा पती करणसिंग सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या फोटोत बिपाशाचे आई वडीलही दिसत आहेत.हेल्थ कॉन्शियस बिपाशाने जाहीर केलेय की, आता ती तिच्या कामांकडे वळणार असून तिच्या आरोग्यावरही लक्ष देणार आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ फॅमिली टाईम. ओव्हरफेड गेटिंग बॅक इनटू डिसीप्लिन अ‍ॅण्ड वर्क मोड सून!!’