सध्या बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा आई होणार असल्याचे बोलले जात आहे. करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि बिपाशा आता आई-वडील होणार आहेत. मात्र, या वृत्ताला बिपाशा किंवा करणने दुजोरा दिलेला नाही. पण हो, प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान बिपाशाने एक खास पोस्ट नक्कीच शेअर केली आहे.
बिपाशा बासूने तिच्या प्रेग्नेंट असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली नसेल, परंतु पती करण सिंग ग्रोव्हरच्या कौतुकात काहीतरी लिहिले आहे. बिपाशाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत करणचे कौतुक केले आहे. इंस्टा स्टोरीवर करणचा फोटो शेअर करून बिपाशाने १०० टक्के हॉटी लिहिले. बिपाशाने करणच्या कौतुकात काही लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा बिपाशा सोशल मीडियावर करणवर प्रेमाचा वर्षाव करत असते.