‘बाईक लव्हर’ जॉन अब्राहम ठरला १.९९ कोटी किमतीच्या महागड्या गाडीचा देशातला पहिला मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 18:22 IST
बॉलिवूडचा ‘हंक’ जॉन अब्राहम याचे बाईक प्रेम सर्वश्रृत आहेच. तो खूप आनंदी असला की आपल्या बाईकवरून फेरफटका मारतो असे ...
‘बाईक लव्हर’ जॉन अब्राहम ठरला १.९९ कोटी किमतीच्या महागड्या गाडीचा देशातला पहिला मालक
बॉलिवूडचा ‘हंक’ जॉन अब्राहम याचे बाईक प्रेम सर्वश्रृत आहेच. तो खूप आनंदी असला की आपल्या बाईकवरून फेरफटका मारतो असे त्याने कबूलही केले आहे. मात्र, त्याच्या आवडत्या गाड्यांच्या ताफ्यात आता आणखी एका महागड्या व पॉवरफु ल कारचा समावेश झाला आहे. देशातली पहिली ‘निसान जीटी-आर ब्लॅक अॅडिशन’ या कारचा तो देशभरात पहिला मालक ठरला आहे. आपल्या या कारचा फोटो त्याने फेसबुकवरून शेअर केला आहे. देशातील सर्वांत महागड्या बाईक पैकी एक असलेल्या अनेक बाईक्स जॉन अब्राहमने विकत घेतल्या आहेत. यात ‘राजपुताना लाईट फूट’, ‘कावासाकी निंजा झेडझेडआर १४००’, ‘डुकाटी डायवेल’, ‘यामाहा व्हिमॅक्स’, ‘महिंद्रा मोजो’, ‘सुझुकी हायबुसा’ यांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्याकडे महागड्या कार देखील आहेत. त्याच्या कारच्या ताफ्यात आता आता सुमारे १.९९ कोटी किंमत असलेल्या ‘जीटी-आर ब्लॅक अॅडिशन’चा समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही कार भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली होती. विशेष म्हणजे सरकारने देशात ५०० व १०००च्या नोटांवर बंदी आणल्यावर ही कार लॉंच करण्यात आली आहे. मात्र, भारतात नोटबंदीमुळे आर्थिक व्यवहारावर निर्बंध आल्यामुळे अनेक व्यवसाय मंद झाले आहेत. या दरम्यान निसानची ही कार खरेदी करणार तो एकमेव भारतीय ठरला आहे. या कारसाठी त्याने निसानचे देखील आभार मानले आहेत. जॉनच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स २’ हा चित्रपट नोटबंदीच्या काळातच लाँच झाला होता. या चित्रपटाला नोटबंदीचा फटका बसला होता. तर चित्रपट समीक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ‘फोर्स’ सिरीजच्या तिसºया चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जॉनने जाहीर केले होते.