Join us  

मोठी बातमी! सुशांत सिंग राजपूतच्या भावाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 7:18 PM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावाला पटनातील रुग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज बबलू यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नीरज बबलू यांना बुधवारी सायंकाळी हार्टअटॅक आला होता. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. कुटुंबीयांनी सांगितले की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे म्हटले जात आहे भाजप आमदार नीरज बबलू यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केली होती. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वैयक्तिक रुपात सीबीआय तपास करण्याची मागणी केली होती. ते सुशांतच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईलाही आले होते.

बिहारमध्ये आमदारकीच्या निवडणुकांसाठी बुधवारी भाजपने ३५  उमेदवारांची यादी जारी केली आहे. या लिस्टमध्ये सुशांत सिंग राजपूत यांचे भाऊ नीरज सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. नीरज सिंग यांना छातापुर विधानसभासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. नीरज सिंग या सीटवरुन तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर २८ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यांतर्गत ९४ जागांवर ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मत मोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल व निकाल समोर येईल.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४ महिने उलटले आहेत. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाचा सीबीआय लवकरच तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत