Join us  

आम्हाला वेड लागलं तर जबाबदार कोण?; 'सूर्यवंशम पीडित' व्यक्तीचं सेट मॅक्स चॅनलला धमाल पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:03 AM

आजपर्यंत अनेकदा तुम्ही टीव्हीवर सूर्यवंशम चित्रपट पाहिला असेल. त्यानंतर हा चित्रपट इतक्यांदा का दाखवला जातो असंही तुम्हाला वाटलं असेल.

बिग बी अमिताभ बच्चन यांना भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचे नव्या-जुन्या सर्वच चित्रपटांना आजही पसंत केलं जातं. यापैकी एक चित्रपट म्हणजे सूर्यवंशम जो अनेकदा चर्चेत राहतो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटली. पण आजही टीव्हीवर तो येत असल्यामुळे चर्चेचा विषय ठरतो.

एका प्रेक्षकाने सेट मॅक्सला चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवण्यासाठी पत्र लिहिल्यानं हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही पत्रात करण्यात आलाय. याशिवाय त्या व्यक्तीनं आपल्याला सूर्यवंशम पीडित असंही म्हटलंय. सध्या सोशल मीडियावर एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'सूर्यवंशम' पाहून एक व्यक्ती त्रासल्याचं दिसून येतंय. त्यांनी आपल्या समस्येबाबत वाहिनीला पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपट अजून किती दिवसात प्रसारित होणार याची विचारणा केली आहे.

“तुम्हाला सूर्यवंशम चित्रपटाच्या प्रसारणाचे अधिकार मिळालं आहे. तुमच्या कृपेने मी आणि आमचं कुटुंब हीरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तमरित्या ओळखून झालो. आतापर्यंत किती वेळा या चित्रपटाचं प्रसारण केलंय हे मला जाणून घ्यायचं आहे. भविष्यात किती वेळा या चित्रपटाचं प्रसारण केलं जाणार आहे. जर आमच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम झाला तर याचं जबाबदार कोण? कृपया माहिती द्यावी,” असं या पत्रात नमूद केलंय. तसंच यात त्यानं आपलं नाव सूर्यवंशम पीडित असं लिहिलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चन