Join us  

Salman Khan NFT: सलमान खानकडून क्रिप्टो प्लॅनची मोठी घोषणा; म्हणाला, 'भावांनो, येतोय NFT घेऊन'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 8:41 PM

Salman Khan NFT coming soon: सलमानने ट्विट करून याची माहिती दिली आहे. सलमान खान स्टेटिक NFTs लवकरच @bollycoin वर येत आहे, संपर्कात रहा, असे ट्विट सलमानने केले आहे. 

डिजिटल वर्ल्डमध्ये क्रिप्टोकरन्सीने (Crypto currency) धुमाकूळ घातला आहे. अमिताभ बच्चन सारख्या ज्येष्ठांसह देशातील तरुणाई या क्रिप्टोकरन्सीच्या मागे लागली आहे. याच काळात NFT ची देखील क्रेझ वाढू लागली आहे. यामुळे बॉलिवूडचा दंबंग सलमान खानने (Salman Khan) मोठी घोषणा केली आहे. त्याने आपल्या चाहत्यांसाठी लवकरच NFT घेऊन येत असल्याचे म्हटले आहे. (Salman Khan NFT coming soon.)

सलमानने ट्विट करून याची माहिती दिली आहे. सलमान खान स्टेटिक NFTs लवकरच @bollycoin वर येत आहे, संपर्कात रहा, असे ट्विट सलमानने केले आहे. 

एनएफटी म्हणजे काय? (What is NFT)NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन. NFT ही ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून सुरक्षित केली जाते. कोणतीही वस्तू एनएफटी केल्यास त्याचे कॉपीराईट ब्लॉकचेनद्वारे सुरक्षित केले जातात. एनएफटीमध्ये नव्या काळातील लिलावच आहे. कोणतेही चित्र किंवा एखादी कलाकृती जिची दुसरी क़ॉपी या जगात नाही ती एनएफटी द्वारे संरक्षित करून त्याद्वारे लोक पैसे कमवू शकणार आहेत. 

जर तुम्ही स्वत: बनविलेली पेंटिंग NFT करत असाल तर तुम्हाला ती पेंटिंग जेवढ्यावेळा विकली जाईल तेवढ्या वेळा तिचे पैसे मिळत जातील. एक ठराविक रक्कम तुम्हाला मिळत राहील. NFT डिजिटल सर्टिफिकेटद्वारे तुम्ही बनविलेल्या वस्तूची कॉपीराईट सुरक्षित ठेवते. 

साधारणपणे NFT मध्ये क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार केला जातो. यामुळे जो काही व्यवहार होईल तो क्रिप्टोकरन्सीमध्येच केला जाईल. सलमान खान BollyCoin सोबत मिळून आपले कलेक्शन आणणार आहे. Bollycoin मध्ये अतुल अग्निहोत्री, Armand Poonawala आणि काईल लोपेजसह अन्य लोक आहेत. अतुल अग्निहोत्री हा सलमान खानची बहीण अलवीरा खान चा पती आहे. यामध्ये सिनेमे, गाणी आदी एनएफटी केली जाण्याची शक्यता आहे. हे सिनेमे विकले की त्याचा 10 टक्के पैसा BollyCoin ला मिळेल आणि त्यातून तो ज्याचा सिनेमा किंवा कलाविष्कार आहे त्याला पैसे दिले जातील अशी संकल्पना आहे.

सलमानचा दबंग आणि अन्य सिनमे एनएफटी होणार आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे सिनेमे एनएफटीद्वारे ऑगस्टमध्ये उपलब्ध केले आहेत. यासाठी त्यांनी Beyondlife.club चा प्लॅटफॉर्म वापरला आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड