Join us  

‘बेफिक्रे’चे टायटल साँग ‘उडे दिल बेफिक्रे’ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2016 8:19 PM

यात रणवीर व वाणीची अफलातून हॉट केमिस्ट्री पाहायला मिळते.

आदित्य चोपडा दिग्दर्शित व रणवीर सिंह, वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे टायटल साँग ‘उडे दिल बेफिक्रे’ रिलीज करण्यात आले. यात रणवीर व वाणीची अफलातून हॉट केमिस्ट्री पाहायला मिळते. या वर्षात प्रदर्शित होणाºया आगामी चित्रपटांच्या यादीत ‘बेफिक्रे’ची जोरदार चर्चा आहे. आदित्य चोपडा या चित्रपटाच्या निमित्ताने बºयाच वषार्नंतर दिग्दर्शनात पुनरागमन करीत असल्याने देखील हा चित्रपट बातम्यांत स्थान मिळवितो आहे. ‘बेफिक्रे’चा ट्रेलर लाँच झाल्यावर या चित्रपटाच्या टायटल साँगची प्रतिक्षा होती. रणवीर सिंह व वाणी कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘उडे दिल बेफिक्रे’मध्ये दोघांची हॉट केमिस्ट्री पहायला मिळते. गाण्याच्या सुरुवातीपासूनच दोघेही एकमेकांना दम देताना दिसतात. वाणी कपूरचा बोल्ड व रणवीरचा जबरदस्त अंदाज या गाण्याला आणखीच मजेदार बनवितो. हे गाण्याला संगीतकार विशाल पंकज यांनी संगीतबद्ध केले असून बेनी दयाल व सोफ ी चौधरी यांनी आवाज दिला आहे. ‘बेफिक्रे’ हा या वषार्तील बॉलिवूडमधील सर्वांत बोल्ड चित्रपट असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे पोस्टर, गाणे, टीझर व ट्रेलर बोल्ड असल्याचे दिसते. तब्बल आठ वर्षांनंतर आदित्य चोपडा दिग्दर्शनात परत आले असल्याने हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळेच ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नसल्याचे सांगण्यात येते. मागील महिन्यात पॅरिसच्या आयफेल टॉवरहून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. चला तर पाहूया हे गाणे कसे आहे ते....