Join us  

साडीत दिसला भूमीचा सेक्सी अंदाज, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 6:00 AM

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने इंस्टाग्रामवर शेअर केला साडीतील सेक्सी फोटो

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत चर्चेत असते. पण सध्या तिचा एक फोटो चर्चेत आहे. होय, सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चांगली चर्चा होताना दिसतेय. भूमीने साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर अफव्हाईट रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत स्वतःला सेक्सी नारीची उपमा दिली आहे. तिने म्हटलं की, जस्ट सेक्सी नारीने नेसली सेक्सी साडी.

या फोटोत ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. भूमीने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी नेसली आहे.  भूमी पेडणेकर हिच्या साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षांव होतो आहे. 

काही दिवसांपूर्वी भूमीने काळ्या रंगाच्या साडीतील देखील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोतून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

भूमी पेडणेकरचा नुकताच ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन महिलांची भूमिका त्या दोघींनी साकारल्या होत्या.

वयाच्या साठीत शूटींगची सुरुवात करणाऱ्या या शूटर दादींनी अनेक मेडल जिंकले आहेत. या चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा मिळाली. तसेच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

आता भूमी पेडणेकर पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यनअनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :भूमी पेडणेकर सांड की आँखकार्तिक आर्यनअनन्या पांडे