Join us  

भूमी पेडणेकरचा उर आला भरुन म्हणाली आज प्रत्येकाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 5:33 PM

भूमी पुढे म्हणाली, "मला ठाऊक आहे की या संकटाच्या काळात या डिजिटल आघाडीवर प्रत्येक भारतीय प्रत्येक क्षणी एकमेकांना साह्य करत आहे. आपण यातून नक्की बाहेर पडू''.

भूमी पेडणेकर देशभरातील कोविड-19 रुग्णांना साह्य करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तिने 'कोविड वॉरिअर' हा सोशल मीडिया उपक्रमही सुरू केला आहे. यातून लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर केला जातो. आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय कसे एकत्र आले आहेत याबद्दल भूमीला अभिमान वाटतो.

 भूमी म्हणते, "या संकटाने आपल्याला अभूतपूर्व रितीने एकत्र आणले आहे. आपण दु:खात एकत्र असतो, आपण ज्यांना ओळखतही नाही अशांसाठी प्रार्थना करताना आपण एकत्र येतो, आपण प्राण वाचवण्यासाठी एकत्र आलो आपण मानवतेसाठी एकत्र आलो. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे, इतरांची मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते. एक नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सर्व भारतीय कसे एकत्र आलो आहोत."  

भूमी लोकांना मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करतेय आणि शक्य तितक्या गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी तिने सोशल मीडियाचा वापर केला आहे. तिच्या या उपक्रमामुळे अनेक आयुष्यं वाचली आहेत.ती म्हणते, "कोविड वॉरिअरने सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर व्यापक हेतूसाठी केला. एका समान शत्रूसोबत लढणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी यात डिजिटल ताकदीचा वापर झाला.

या संकटकाळात लोकांनी एकमेकांप्रती दाखवलेले प्रेम, काळजी याने मी भारावून गेले आहे. मला कल्पना आहे की या विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे .मी कोणालातरी वाचवण्यासाठी, या संकटाविरोधात लढण्यासाठी प्रत्येक क्षण कामी आणतेय."भूमी पुढे म्हणाली, "मला ठाऊक आहे की या संकटाच्या काळात या डिजिटल आघाडीवर प्रत्येक भारतीय प्रत्येक क्षणी एकमेकांना साह्य करत आहे. आपण यातून नक्की बाहेर पडू. आपण या विषाणूवर मात करू. पण, सध्या आपल्याला शक्य तितके प्राण वाचवायचे आहेत."

 

भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर, चाहते करतायेत तिच्या कामाचं कौतुक

काही दिवसांपूर्वीच  भूमी पेडणेकरला करोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर  लगेचच  तिने एक छोटीशी मोहीम राबवण्याचं ठरवलं. जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करणारे लोक, औषधे पुरवणारे या सर्वांना लोकांशी जोडून देण्याचा प्रयत्न ती करत आहे.त्याचबरोबर तिने करोनाच्या या दुसऱ्या लाटेला गांभीर्याने घेण्याची विनंती केली होती. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आत्मसात करण्याची गरज असल्याचे ती म्हणते.

टॅग्स :भूमी पेडणेकर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस