Join us

'सैयारा' सिनेमा पाहून हमसून हमसून रडली भारती सिंह, म्हणाली- "मी २-३ वेळा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:10 IST

भारती सिंह पती हर्ष लिंबाचियासोबत 'सैयारा' सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. Gen Z प्रमाणेच भारतीलाही सिनेमा पाहताना रडू कोसळलं.

सध्या 'सैयारा' या बॉलिवूड सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. तर तरुणाईलाही वेड लावलं आहे. सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. काही जण सिनेमा पाहताना थिएटरमध्येच रडत असल्याचेही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. कॉमेडियन भारती सिंहलाही 'सैयारा' सिनेमा पाहताना रडू कोसळलं. 

भारती सिंह पती हर्ष लिंबाचियासोबत 'सैयारा' सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. Gen Z प्रमाणेच भारतीलाही सिनेमा पाहताना रडू कोसळलं. 'सैयारा' सिनेमा पाहिल्यानंतर भारतीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करत सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. 'सैयारा' सिनेमाबाबत भारती म्हणते, "काय सिनेमा होता यार...आम्ही सिनेमा पाहिला. खूप छान सिनेमा होता. मी सिनेमा पाहताना २-३ वेळा रडले. रडत रडत मी बाहेर पडले नाही. पण, सिनेमाचा शेवट चांगला होता". तर व्हिडीओत हर्ष लिंबाचिया "मी रडलो नाही" असं म्हणत आहे. 

दरम्यान, 'सैयारा' सिनेमात अहान पांडे आणिअनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोहीत सुरीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर 'सैयारा'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत सिनेमाने १९५.२५ कोटींचा बिजनेस केला आहे. 

टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटी