भाईजान सलमान खानपुढे रणबीर कपूरने टेकले गुडघे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 20:10 IST
काही दिवसांपूर्वीच माध्यमांमध्ये एक बातमी वाºयासारखी पसरली होती. बातमीनुसार या वर्षाच्या अखेरीस बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि रणबीर कपूर ...
भाईजान सलमान खानपुढे रणबीर कपूरने टेकले गुडघे!
काही दिवसांपूर्वीच माध्यमांमध्ये एक बातमी वाºयासारखी पसरली होती. बातमीनुसार या वर्षाच्या अखेरीस बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि रणबीर कपूर हे आमनेसामने भिडणार आहेत. यावर्षाच्या अखेरीस सलमानचा ‘टायगर जिंदा है’ आणि रणबीरचा ‘दत्त’ बॉलिवूडवर क्लॅश होणार असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये घमासान बघावयास मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु आता आलेल्या माहितीनुसार रणबीरने सलमानपुढे स्पशेल गुडघे टेकले असून, त्याच्याशी पंगा घेण्याच्या मानसिकतेत तो अजिबात नाही. रणबीरच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या नवे गाणे लॉन्चप्रसंगी जेव्हा रणबीरला याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर अनेकांना अचंबित करणारे ठरले. रणबीरने म्हटले की, ‘सलमान खानला बॉक्स आॅफिसवर टक्कर देण्याची चूक मी कधीच करणार नाही. तसेच सलमानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट असेल’ असे भाकीतही केले. रणबीरचे स्टेटमेंट ऐकून अनेकांना शॉक बसला आहे. शिवाय रणबीर सलमानचा फॅन्स तर झाला नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. रणबीरने माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘दत्त’च्या निर्मात्यांनी बॉक्स आॅफिसला लक्षात घेऊन सर्व काही प्लॅन केले आहे. मला सांगण्यात आले की, ‘दत्त’ बॉक्स आॅफिसवर डिसेंबरमध्ये नव्हे तर पुढच्यावर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे. रणबीरच्या या वक्तव्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली असून, सलमानशी पंगा घेण्यास सध्या तरी कोणताही कलाकार उत्सुक नाही. गेल्यावर्षी शाहरूखचा ‘रईस’ सलमानच्या ‘सुलतान’ला क्रॅश होणार होता. परंतु निर्मात्यांनी लगेचच आपण निर्णय मागे घेत चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. शिवाय रणबीरच्या या वक्तव्यामुळे हेही स्पष्ट झाले की, यावर्षी एकही मोठ्या बॅनरचा चित्रपट आपापसात भिडणार नाही. कारण शाहरूखच्या ‘जब हैरी मेट सेजल’ या चित्रपटाचीही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाबरोबर त्याची फाइट टळली आहे. कारण हे दोन्ही चित्रपट मोठ्या बॅनरचे असून, जर यांच्यात लढत झाली असती तर बॉक्स आॅफिसवर चांगलेच घमासान बघावयास मिळाले असते, यात दुमत नाही.