Join us  

कोरोना : घरी बसून कंटाळला असाल तर या BEST वेबसीरिज बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 8:00 AM

काही दमदार वेबसीरिज पाहून तुम्ही मस्तपैकी लोळत वेळ घालवू शकता.

कोरोना व्हायरसचा परिणाम अख्ख्या देशभर पाहायला मिळतोय. सरकारने घरात राहण्याचे आवाहन केल्यानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. कार्यालये, शाळा, जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सगळी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत.अशात अनेक जण घरात राहून कंटाळत आहेत. पण आता चिंता नसावी. काही दमदार वेबसीरिज पाहून तुम्ही मस्तपैकी लोळत वेळ घालवू शकत.

परमनंट रूममेट्स

सुमित व्यास व निधी सिंगची वेबसीरिज ‘परमनंट रूममेट्स’ ही वेबसीरिज तुम्ही कधीही पाहू शकता. ही भारतातील पहिली वेब सीरिज आहे.  

द ट्रिपलिंग

कुटुंबासोबत बसून तुम्ही एक हेल्दी कॉमेडी वेब सीरिज पाहू इच्छिता तर यापेक्षा दुसरी कुठलीही वेबसीरिज नाही. चंदन, चंचल व चितवन या तीन भावंडांवर आधारित या वेबसीरिजमध्ये कॉमेडी, इमोशन्स, लव्ह, रोमान्स असे सगळे काही आहे. टीव्हीएफ प्लेवर तुम्ही ती पाहू शकता.

पिचर्स

यंग्सटर्स, त्यांचे डिसीजन व त्यांचा स्ट्रगल असे काही बघायचे असेल तर ही वेबसीरिज मस्त आहे. चार मित्रांच्या आयुष्याशी संबंधित घटना आणि फुल एंटरटेनमेंट असे सगळे यात आहे.

हॉस्टेजेस

रोमॅन्टिक व कॉमेडी पाहून कंटाळा आला असेल आणि काही थ्रीलर पाहायचे असेल तर ही वेबसीरिज बेस्ट आहे. टिस्का चोप्रा, रोनित रॉय यांच्या अभिनयाने सजलेली ही वेबसीरिज तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

क्रिमिनल जस्टिस

विक्रांत मेस्सीच्या अ‍ॅक्टिंगचे दिवाने असाल तर ही वेबसीरिज तुम्ही पाहायलाच हवी. अ‍ॅक्शन व थ्रीलर असे सगळेकाही असलेली ही वेबसीरिज तुम्ही हॉटस्टारवर बघू शकता.

दिल्ली क्राईम

निर्भया केसवर आधारित या वेबसीरिजमधील शेफालीचा अभिनय बघण्यासारखा आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही ही वेबसीरिज तुम्ही पाहू शकता.

कोटा फॅक्ट्री

स्टुडंट लाईफवरची ही वेबसीरिज तुम्ही टीव्हीएफ प्लेवर पाहू शकता.

फ्लेम्स

स्कूल लाईफवरची ही वेबसीरिज पाहिल्यानंतर किशोरवयीन मुलांच्या मन:स्थितीबद्दल, त्यांच्या भावभावना तुम्ही समजू शकाल. फुलआॅन टाईमपास करणारी ही वेबसीरिज तुम्ही टीव्हीएफ प्लेवर पाहू शकता.

असूर

अर्शद वारसीची ही वेबसीरिज ‘वूट’वर उपलब्ध आहे. या वेबसीरिजसोबत अर्शदने डिजिटल डेब्यू केला आहे.

भौकाल

 आयपीएस नवनीत सिकेरा यांनी उत्तर प्रदेशात अनेक गुंडांचा खात्मा केला. त्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. मोहित रैना यात लीड रोलमध्ये आहे. एमएक्स प्लेअरवर ही वेबसीरिज तुम्ही पाहू शकता.

स्पेशल आॅप्स

बेबी, स्पेशल 26 यासारखे सिनेमे बनवणारे नीरज पांडे यांनी या वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल डेब्यू केला आहे. रॉ आणि या संस्थेचे काही आॅपरेशन यात दाखवण्यात आले आहेत. हॉटस्टारवर ही वेबसीरिज तुम्ही पाहू शकता.

ताजमहल 1989

नेटफ्लिक्सवर आलेली ही वेबसीरिज बरीच जुनी आहे. पण सध्याच्या स्थितीत पाहण्यासाठी एकदम बेस्ट आहे. नीरज काबी, गीतांजली कुलकर्णींच्या अभिनयाने सजलेली ही वेबसीरिज दमदार आहे.

 शी

इम्तियाज अलीची ही वेबसीरिज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. विजय वर्मा यात मुख्य भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही ही वेबसीरिज पाहू शकता.

 

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या