प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रूपा दत्ता (Rupa Dutta Arrested) हिला अटक झाल्याने बंगाली फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. कोलकात्यातील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात पाकिटमाारी केल्याच्या आरोपाखाली या अभिनेत्रीला अटक झाल्याचे कळतेय. तिच्या बॅगेतून 65 हजार 760 रुपये सापडले, मात्र चौकशीदरम्यान हे पैसे कुठून आले, याबाबत ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. चौकशी केली असता, तिने कबूल केले की ती गर्दीत पाकिट मारत होती.
अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यातकोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यामध्ये काही पोलिस तैनात होते. एका पोलिसाला एक महिला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकत असल्याचं दिसली. त्याला तिचा संशय आला. पोलिसांनी लगेच तिची चौकशी सुरू केली. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी तिच्या बॅगेची झडती घेतली असता तिच्या बॅगेत 65 हजार 760 रूपये सापडले. नंतर तिला पोलिस ठाण्यात आणलं असता, ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रूपा दत्ता असल्याचं समोर आले. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.