या कारणामुळे सनी लिओनीला सोडावे लागले होते राहते आपले घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 16:37 IST
सध्या सोशल मीडियावर सगळे सेलिब्रेटी खूपच अॅक्टिव्ह दिसतात. चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते आपल्या पर्सनल गोष्टी कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना ...
या कारणामुळे सनी लिओनीला सोडावे लागले होते राहते आपले घर
सध्या सोशल मीडियावर सगळे सेलिब्रेटी खूपच अॅक्टिव्ह दिसतात. चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते आपल्या पर्सनल गोष्टी कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच बॉलिवूडची डॉल सनी लिओनीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित एक किस्सा शेअर केला आहे. सनी एका एनजीओशी जोडलेली आहे. ही एनजीओ सायबर क्राईमशी निगडित मुद्दांवर काम करते. या एनजीओच्या एक इव्हेंटमध्ये सनी सहभागी झाली होती त्यावेळी तिला एक व्यक्तिने घरात येऊन नुकसान करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी तिचा पती डेनियल देशाच्या बाहेर होता. सनीने पुढे म्हटले आहे कि, मला धमकी दिल्यानंतर ती व्यक्ती माझ्या घराच्याबाहेर येऊन माझा दरवाजा जोर-जोरात वाजवत होती. मी खूप घाबरले होते घरात मी एकटीच होते. मी हातात चाकू घेऊन दरवाजाजवळ उभी होते. या घटनेनंतर मी खूप घाबरले होते. या घटनेनंतर मी इतके घाबरले होते कि मी घरच बदलले. लोक थोड्याशा प्रसिद्धीसाठी अतिशय खतरनाक गोष्टी करतात. आपल्याला अशा गोष्टींपासून जागरुक असायला हवे. लवकरच सनी अरबाज खानसोबत तेरा इंतजार चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात सनी लिओनी अभिनेता अरबाज खानच्या आयुष्यातील मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसणार आहे. सनी लिओनी व अरबाजच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दोघांचेही बोल्ड व किसींग सीन्सची भरमार या ट्रेलरमध्ये आहे. ‘तेरा इंतजार’मध्ये सनीचा प्रियकर बनलेला अरबाज चित्रकाराच्या भूमिकेत आहे. अरबाजला स्वप्नात एक मुलगी दिसते आणि अरबाज तिचेच चित्र काढतो. हीच मुलगी एकदिवस अचानक अरबाज समोर येऊन उभी राहते, असे ट्रेलरमध्ये दिसतेय. यानंतर दोघांचेही प्रेम बहरत असताना अरबाज एकदिवस अचानक बेपत्ता होतो आणि सनी त्याला शोधत सुटते, असेही यात दिसतेय. कथेबद्दल सांगायचे तर या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती भासतेय. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात.ALSO READ : सनी लिओनीबरोबर तुम्हालाही दररोज करता येईल वर्कआउट, वाचा सविस्तर!