Join us

या कारणामुळे सलमान खानची नेहमी स्तुती करते सनी लिओनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:37 IST

सनी लिओनीने जगभरात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचा क्रेडिट तिने दबंग खान म्हणजेच सलमान खानला ...

सनी लिओनीने जगभरात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचा क्रेडिट तिने दबंग खान म्हणजेच सलमान खानला दिले तर वावगे ठरु नये. याच करण असे की, बिग बॉस या रिऑलिटी शोव्दारे सनीने इंडस्ट्रीत पदार्पण केले. सनी बिग बॉसची कंटेंस्ट असताना सलमान नेहमीच तिच्याशी विनम्रपणे आणि मैत्रीपूर्वक वागला. सनीची बॉलिवूडमध्ये एंट्री बिग बॉसच्या माध्यमातून झाली आहे. सनी  बिग बॉसच्या घरात असताना हा शो  होस्ट सलमान खान करित होता. सनी राजीव वालिया याच्या 'तेरा इंतजार' या चित्रपटात अरबाज खानसोबत काम करणार आहे. याबाबत सनी म्हणाली,  मी सलमानला अनेक वेळा भेटली आहे. अरबाज सोबतही मी बराच वेळ घालवला आहे. अरबाज एक चांगला माणूस आहे अरबाजसोबत त्यांचा संपूर्ण कुटुंबीय खूप चांगले आहे. सलमान खूप चांगले व्यक्ती आहे. शाहरुख खानच्या 'रईस' आणि सोनाक्षी सिन्हाच्या नूरमध्ये सनीने छोटीशी भूमिका साकारलेली होती. यानंतर सनी आपल्याला अजय देवगन आणि इम्रान हाश्मीचा आगामी चित्रपट बादशाहोमध्ये एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत इम्रान हाश्मी दिसेल. ती यात पारंपारिक अंदाजात दिसणार आहे. सनीला हे गाणं खूप आवडले आहे. या गाण्याच्या निमित्ताने इम्रानसोबत काम करण्याचा एक चांगला अनुभव मिळाल्याचे ती सांगते.  भविष्यात इम्रानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे ही ती म्हणाली. सनीच्या रईसमधल्या लैला मै लैला  या गाण्याने सगळ्यांना वेड लावले होते. ‘पीएवी गरुडा वेगा’ या चित्रपटसुद्धा आपल्याला तिच्या ठुमक्यांची जादू ती दाखवणार आहे.