Join us  

‘बजरंगी भाईजान’च्या अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू, एक दिवसाआधीच आईचे झाले होते निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 1:03 PM

बॉलिवूडला आणखी एक धक्का

ठळक मुद्दे हरीश हा गे्ल्या 18 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होता. स्वबळावर स्वत:ची ओळख निर्माण करणा-या हरीशने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले.

गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमितांची संख्या घटली असती तरी धोका कायम आहे. कोरोनाने जगभर थैमान घातले. भारतातही कोरोनाचा कहर दिसला. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडले. आता ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा अभिनेता हरीश बंचटा याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. मंगळवारी सकाळी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  एक दिवसआधी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लागोपाठ माय-लेकाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  हरीश हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबासोबत असताना त्याला कोरोनाची लागण झाली. यातच मंगळवारी त्यांचे निधन झाले.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी हरीशच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू झाला त्याच रात्री हरीशचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.  ताप आल्यामुळे त्याला रोहडूहून आयजीएमसी येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. मंगळवारी संध्याकाळी वडिलोपार्जित क्षेत्र कनालॉगमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिश याच्या मागे एक मुलगी असून ती 9 वीत शिकत आहे.हरीश हा गे्ल्या 18 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होता. स्वबळावर स्वत:ची ओळख निर्माण करणा-या हरीशने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले. मात्र सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमामुळे तो प्रकाशझोतात आला. या सिनेमात त्याने पाकिस्तानी पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.हरीशने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. सीआयडी, क्राईम पेट्रोल या मालिकांमध्ये त्याने काम केले.  

  

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड