Join us

संजयसाठी केला 'बाजीराव-मस्तानी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:51 IST

आघाडीची अभिनेत्री असूनही प्रियांका चोप्राची 'बाजीराव-मस्तानी'त दुय्यम भूमिका आहे. मात्र, या विषयी ती अजिबात नाराज नाही. या चित्रपटात काशीबाई ...

आघाडीची अभिनेत्री असूनही प्रियांका चोप्राची 'बाजीराव-मस्तानी'त दुय्यम भूमिका आहे. मात्र, या विषयी ती अजिबात नाराज नाही. या चित्रपटात काशीबाई या बाजीरावांच्या पत्नीची आव्हानात्मक भूमिका मी करते आहे आणि मी खरंच आनंदी आहे. हा चित्रपट मी केवळ दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासाठी केला आहे, असे तिने स्पष्ट केले आहे. या चित्रपटात मस्तानी दीपिका पदुकोण आहे. रणवीर बाजीराव आहे. मग तू हा चित्रपट का स्वीकारलास? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. खरंतर या चित्रपटाचे स्क्रीप्ट घेऊन दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सर्वप्रथम माझ्याकडे आला आणि मीच ही काशीबाईची भूमिका करावी, असा आग्रह धरला. सर्वप्रथम माझीच निवड झाली. नंतर इतरांची निवड करण्यात आली. खरंतर ही भूमिका करणे सोपे नव्हते. या भूमिकेत अनेक हृदयस्पश्री आणि भावनाप्रधान प्रसंग आहेत. त्यासाठी मला महाराष्ट्रातील स्त्रियांची जीवनशैली समजून घ्यावी लागली. त्याचा प्रभाव माझ्यावर पडला आणि तो मी तसाच कायम ठेवणार आहे. वास्तविक मी केवळ भूमिकेपुरती त्या 'रोल'मध्ये शिरणारी अभिनेत्री आहे. पण, 'बाजीराव-मस्तानी'मला खूप काही देऊन गेला आहे.