Join us

​‘बाहुबली’ प्रभासने मानलेत चाहत्यांचे आभार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 13:27 IST

‘बाहुबली’ सीरिजने साऊथ सुपरस्टार प्रभासला भारतीय सिनेमाचा सगळ्यात मोठा तारा बनवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे सगळ्यात ...

‘बाहुबली’ सीरिजने साऊथ सुपरस्टार प्रभासला भारतीय सिनेमाचा सगळ्यात मोठा तारा बनवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे सगळ्यात मोठे उदाहरण कोणते असेल तर ‘बाहुबली2’ची रेकॉर्डतोड कमाई. केवळ भारतातच नाही तर जगातील सर्व कोपºयात ‘बाहुबली2’ची धूम आहे. गत नऊ दिवसांत भारतात या चित्रपटाने ८०० कोटी रूपयांची कमाई केली. तर विदेशात २०० कोटी रूपयांचा गल्ला जमवला. देश-विदेशातील कमाई मिळून १ हजार कोटी रुपए कमावणारा ‘बाहुबली2’ हा  भारतीय सिनेमातील पहिला चित्रपट बनला आहे. आता या अभूतपूर्व यशानंतर चाहत्यांचे धन्यवाद तर करायलाच हवेत.‘बाहुबली2’चा हिरो प्रभासने याबद्दल चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. प्रभासने त्याच्या फेसबुक पेजवर एक भावनिक पोस्ट लिहून चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणाºया चाहत्यांना मी मिठी मारून आभार व्यक्त करतो.  मी सर्वोतम काम करण्याचे प्रयत्न केले होते. माझे हे काम आपणा सर्वांना आवडले, याचा मला आनंद आहे. आपणा सर्वांचे प्रेम बघून आपले आभार कसे मानावे, हेच मला कळत नाहीय. ‘बाहुबली’चा संपूर्ण प्रवास दीर्घ होता. या संपूर्ण प्रवासातून एक कुठली गोष्ट मी सोबत घेऊन जाणार असेल तर ते तुम्हा सर्वांचे प्रेम आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांचेही आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय भूमिका करण्याची संधी दिली. ‘बाहुबली’चा संपूर्ण प्रवास अतिशय अविस्मरणीय राहिला, असे प्रभासने लिहिले आहे.ALSO READ : या कारणामुळे 'बाहुबली' अभिनेता प्रभासने नाकारली 10 कोटींच्या जाहिरातीच्या ऑफर्सप्रभासने ‘बाहुबली’ सीरिजमध्ये दोन भूमिका वठवल्या आहेत. एक अमरेन्द्र बाहुबली आणि दुसरी महेन्द्र बाहुबली. या दोन्ही भूमिकांना प्रभासने असा काही न्याय दिला की, लोक त्याची प्रशंसा करताना थकत नाहीयेत.